Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : सलमान खानच्या 'गॅलेक्सी'त साप आढळल्याने खळबळ, तातडीने सर्पमित्राला पाचारण

Salman Khan-Galaxy Apartment Snake Rescue : बॉलिवूडचा भाईजान सलामान खानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स'च्या आवारात साप आढळला. ज्यामुळे गोंधळ उडाला. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

सलामान खानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स'च्या आवारात साप आढळला.

सोमवारी ही घटना घडली.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या सलमान खान सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय आहे. त्यांच्या सोशल मिडिया पोस्ट कायम चर्चेचा विषय असतात. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स'च्या आवारात साप आढळला. ज्यामुळे गोंधळ उडाला.

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, सोमवारी मुंबईतील सलमान खानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स'च्या आवारातून एका सापाची सुटका करण्यात आली. साप आढळल्यावर तेथे सर्पमित्राला बोलवण्यात आले. तसेच बचावकार्यात मदत करण्यासाठी काही अधिकारीही तिथे दाखल झाले होते. ज्या बिल्डिंगमध्ये सलमान खान आपल्या कुटुंबासह राहतो, त्या बिल्डिंगच्या खालील भागात हा साप आढळून आला.

घटनास्थळावरून समोर आलेल्या दृश्यांमध्ये, तो सर्पमित्र अत्यंत शांतपणे त्या सापाचा पाठलाग करताना, त्याला शेपटीला धरून पकडताना, आपल्या हाताभोवती गुंडाळताना आणि शेवटी एका पिशवीत घालून अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करताना दिसत आहे.

कोणत्याही संरक्षक साधनांशिवाय ज्या पद्धतीने त्या सापाला हाताळण्यात आले, त्यावरून तो साप बिनविषारी असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. सर्पमित्राच्या या प्रयत्नांना मदत करण्यासाठी काही अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. साप पकडणाऱ्या व्यक्तीला कोणी माहिती दिली याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता सर्व परिस्थिती शांत आहे.

सलमान खान आगामी प्रकल्प

सलमान खान अनेक मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' चित्रपट १४ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खान सध्या तेलुगू चित्रपट दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्यासोबत चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. नुकताच सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसला. त्याचा कॅमिओ होता. भाईजानने 'जीवा महाला' यांची भूमिका साकारली. भाईजानच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Council : मोबाइल स्वस्त होणार का? GST बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता

Weight Loss : सकाळच्या वॉकनंतर १ महिना खा 'हा' नाश्ता; झटपट वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: सोलापूर महानगरपालिकेत 127 पदांची तातडीने भरती होणार

Gold Rate Today : सोन्याच्या दरात एका आठवड्यात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील ताजे दर

राजकारणात खळबळ, बड्या नेत्याची गोळ्या मारून हत्या; परिसरात प्रचंड तणाव

SCROLL FOR NEXT