Salman Khan Death Threat Answer Twitter
मनोरंजन बातम्या

Salman Khan Death Threats: मुंबईपेक्षा दुबईत मला जास्त सुरक्षित वाटतं... सलमान खानच्या प्रतिक्रियेमुळे वाद होण्याची शक्यता

Salman Khan Feels Safe At Dubai: मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे.

Pooja Dange

Salman Khan Feels Safe In Dubai Rather Than Mumbai: सलमान खान सध्या त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. सलमान खान नुकताच एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाला होता. सलमानच्या या मुलाखतीतील त्याने अनेक खुलासे केले आहेत. तसेच सलमान त्याच्या सुरक्षिततेविषयी देखील या मुलाखतीत बोलला आहे.

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या, त्यानंतर अभिनेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर त्याने त्याची सुरक्षा वाढवली आहे. (Latest Entertainment News)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता की, 'जर सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागितली नाही तर त्याला त्याचा वाईट परिणाम भोगायला लागेल'. यानंतर सलमान खान धमकीचा मेल आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचा कॉल आला होता.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे, तसेच सलमान देखील त्याच्या सुरक्षेबाबत खूप दक्ष आहे. एका मुलाखती दरम्यान सलमान खानने त्याच्या सुरक्षेबद्दल सांगितले की, असुरक्षिततेपेक्षा सुरक्षा चांगली आहे. आता रस्त्यावर सायकल चालवून एकट्याने कुठेही जाणे शक्य नाही.

याशिवाय सलमान म्हणाला की मला धमक्यांची भीती नाही आणि मी यूएईमध्ये (दुबई) पूर्णपणे सुरक्षित आहे. तो म्हणाले की, भारतात एक समस्या आहे. सलमानचे म्हणणे आहे की, त्याला आता मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटू लागली आहे. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं त्याला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचे दिसून त्याला लक्षात आले आहे. त्याला जे काही करायला सांगण्यात आले आहे ते तो अतिशय सावधानपूर्वक करतो आहे. स्वतःची खूप काळजी घेत आहे.

नुकताच सलमानचा 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची जितकी चर्चा झाली टिकत प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाही. तब्बल ४ वर्षांनी ईदच्या दिवशी सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

सलमान खान लवकरच यशराजच्या टायगर वर्सेस पठाणमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमान आणि शाहरुख एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. याशिवाय सलमान खान टायगर ३ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ काम करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT