Salman Khan News: हिंदी सिने जगतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून सलमान खानचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने सिने जगतात दबंग स्टार म्हणून ओळख मिळवणारा सलमान खान करोडो संपत्तीचा मालक आहे. बॉलिवूडच्या भाईजानचा आज( २७, डिसेंबर) ५७ वा वाढदिवस.
पन्नाशी उलटली तरी भाईजान आजही विवाहीत आहे त्यामुळे सलमान खानची करोडोंची संपत्ती कोणाच्या नावे होणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? याबद्दलचा खुलासा सलमान खानने एका मुलाखतीत केला होता. ( Salman Khan)
सलमान खान हा बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच सलमान खानचे नाव जगभरातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ठ आहे.
मात्र आजपर्यंत अविवाहित असलेल्या सलमान खानची करोडोंची संपत्ती कोणाच्या नावे जाणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडतो, याबद्दल सलमान खानने एका मुलाखतीत खुलासा केला होता. या मुलाखतीत सलमान खानने सांगितले की, मी लग्न करु किंवा न करु माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा ट्रस्टमध्ये जाईल. तसेच जर मी लग्न केले नाही तर सगळी संपत्ती बेईंग ह्यूमन या ट्रस्टच्या नावावर केली जाईल.
दरम्यान बेईंग ह्यूमन ही अभिनेता सलमान खानची संस्था असून त्यामार्फत तो कॅंन्सरग्रस्त मुलांना मदत करत असतो. मैंने प्यार किया, साजन, हम आपके हैं कौन, करण-अर्जुन, जुड़वा, प्यार किया तो डरना क्या. दबंग, बॉडीगॉर्ड, एक था टाइगर, बजरंगी भाईजान अशा दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.