Bigg Boss 19 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' ची चमकदार ट्रॉफी पाहिली का? PHOTO होतोय व्हायरल

Bigg Boss 19 Trophy Photo : 'बिग बॉस १९' चा ग्रँड फिनाले दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'बिग बॉस १९' ची शानदार ट्रॉफी पाहा.

Shreya Maskar

'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडणार आहे.

सोशल मीडियावर ट्रॉफीचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

'बिग बॉस १९'च्या विजेत्यांमध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून 'बिग बॉस १९'सुरू आहे. या शोचे होस्टिंग सलमान खान करत आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्यावर आला आहे. दोन दिवसांत 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडणार आहे. 'बिग बॉस १९'च्या विजेत्याला शानदार ट्रॉफीसोबत मोठी रक्कम देखील मिळणार आहे. अशात 'बिग बॉस १९'च्या आलिशान ट्रॉफीचा फोटो समोर आला आहे.

'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदाची ट्रॉफीमध्ये दोन हात जोडलेले पाहायला मिळत आहे. जे घरासारखे दिसत आहे. तसेच त्यात BB असे लिहिलं आहे. एकंदर बिग बॉसचे घर वाटत आहे. ट्रॉफीवर 'Winner - Bigg Boss 19' असे लिहिलं आहे. 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विजेत्यांमध्ये गौरव खन्ना आणि प्रणित मोरे यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस 19'च्या विजेत्याला बक्षीस काय मिळणार?

'बिग बॉस 19' च्या विजेत्याला सुंदर मोठी चमकदार 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी मिळणार आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'च्या विजेत्याला तब्बल 50 कोटी रुपये मिळणार असल्याचे बोले जात आहे. 'बिग बॉस 18' चा विजेता करणवीर मेहरा देखील 50 लाख रुपये मिळाले होते.

'बिग बॉस 19'चे टॉप 5 स्पर्धक

  1. गौरव खन्ना

  2. प्रणित मोरे

  3. फरहाना भट्ट

  4. अमाल मलिक

  5. तान्या मित्तल

ग्रँड फिनाले कुठे अन् कधी पाहता येणार?

सलमान खानचा शो 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर रोजी रात्री 9.00 वाजता जिओ हॉटस्टारवर आणि कलर्स टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस १९' च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव कोरले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT