Fan Entry In Bigg Boss House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: अखेर चाहत्यांची इच्छा झाली पूर्ण! बिग बॉसचे आलिशान घर पाहून झाले आश्चर्यचकीत; VIDEO व्हायरल

Fan Entry In Bigg Boss House: बिग बॉस या शोचे चाहते बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळावी यासाठी विनंती करत होते. चाहत्यांकडून सतत होणारी मागणी लक्षात घेता बिग बॉस शो सुरू असताना होस्ट सलमान खानने बिग बॉसकडे या शोच्या चाहत्यांना घरामध्ये एन्ट्री मिळावी, अशी विनंती केली होती.

Priya More

Bigg Boss 17 Fans:

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'ने (Bigg Boss 17) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. बिग बॉसच्या 17 व्या सीझनची ट्रॉफी मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) आपल्या नावावर केली. बिग बॉसचा हा सीझन खूपच रंगतदार झाला. या सीझनला प्रेक्षकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला. बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.

बिग बॉस या शोचे चाहते बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळावी यासाठी विनंती करत होते. चाहत्यांकडून सतत होणारी मागणी लक्षात घेता बिग बॉस शो सुरू असताना होस्ट सलमान खानने बिग बॉसकडे या शोच्या चाहत्यांना घरामध्ये एन्ट्री मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार बिग बॉसने देखील सलमान खानने केलेल्या विनंतीला होकार दिला होता. बिग बॉसने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. नुकताच बिग बॉसच्या आलिशान घरामध्ये चाहत्यांनी एन्ट्री घेतली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये काही चाहते एन्ट्री करत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि आज बिग बॉसने ते पूर्ण केले आहे. बिग बॉसच्या आलिशान घरामध्ये गेल्यानंतर या सर्व चाहत्यांना विश्वासच बसत नव्हता. ते एकमेकांशी याबाबत बोलताना दिसत आहेत.

टीव्हीवर जे बिग बॉसचे घर हे प्रेक्षक पाहायचे आज प्रत्यक्षात त्यांना त्या घरामध्ये येण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. बिग बॉसचे घर खूपच छान आणि सुंदर असल्याचे ते एकमेकांना सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळाल्याबद्दल या सर्व चाहत्यांनी बिग बॉस आणि मेक माय ट्रिपचे आभार मानले आहेत.

दरम्यान, बिग बॉस 17 या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळला. बिग बॉस 17 मध्ये विकी जैन, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, मुनावर फारुकी, मनारा चोप्रा, अरुण मशेट्टी हे स्पर्धक खूप चर्चेत राहिले. साडेतीन महिने हा शो चालला. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने या शोची ट्रॉफी जिंकूनच दाखवली. मुनव्वर फारुकीने या शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुनव्वर फारुकीला या शोच्या ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये आणि कार बक्षीस स्वरुपात देण्यात आली. हा शो जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर पोस्ट करत सलमान खानचे आभार मानले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

Suraj Chavan New House: गुलीगत स्टारचं अलिशान घर, डोळे दिपवणारं इंटेरिअर

Maharashtra Live News Update: बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT