TBMAUJ Twitter Reaction: 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ला प्रेक्षकांची पसंती, शाहिद-क्रितीच्या केमिस्ट्रीचं होतेय कौतुक

Shahid Kapoor And Kriti Senon: 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरबाहेर मोठी गर्दी केली आहे.
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya MovieSaam Tv

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie:

'व्हॅलेंटाईन डे' निमित्त माणूस आणि रोबोटच्या लव्हस्टोरीवर आधारित 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (teri baaton mein aisa uljha jiya movie) हा चित्रपट आज म्हणजेच ९ फेब्रुवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रोमँटिक आणि कॉमेडीचे मिश्रण असलेल्या या चित्रपटात शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Senon) मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात शाहिद कपूरने एका वैज्ञानिकाची तर क्रिती सेननने रोबोटची भूमिका साकारली आहे.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरबाहेर मोठी गर्दी केली आहे. या चित्रपटातील शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. दोघांच्याही अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाबाबत आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक जण आपले मत व्यक्त करत आहेत.

क्रिती सेनन आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. आज हा चित्रपट रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच चांगली चर्चा झाली. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कमाई केली होती. आता रिलीज झाल्यानंतर देखील चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ आहे हे पाहायाला मिळत आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रेक्षक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाचे प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटाबाबत ट्विटरवर (TBMAUJ Twitter Reaction) नेमकं काय प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या हे आज आपण पाहणार आहोत...

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चा पहिला शो पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी ट्विटरवर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. कुणाला शाहिद कपूरचा अभिनय आवडला आहे. तर कोणी चित्रपटातील कॉमेडी सीन्सचे कौतुक करत आहे. या सगळ्याशिवाय 'तेरी बात में ऐसा उल्झा जिया' मध्ये क्रिती सेनॉनचा अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनने पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. या दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली आहे.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ला ट्विटरवर खूप प्रेम मिळत आहे. शाहिद आणि क्रिती या दोघांच्या अभिनयाचे नेटिझन्स कौतुक करत आहेत. शाहिद-क्रितीच्या या चित्रपटात जान्हवी कपूरचा कॅमिओ देखील दिसणार आहे. ट्विटरवर रिव्ह्यू शेअर करताना एका यूजरने सांगितले की, 'मिस्टर आणि मिसेस माहीचा बिल्डअप देण्यात आला आहे.' यासोबत युजरने सिल्वाटेवर्सचाही उल्लेख केला आहे.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' रिलीज होण्यापूर्वी ॲडव्हान्स बुकिंगची बरीच चर्चा झाली होती. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 2 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यानंतर शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका करणार असल्याचे मानले जात आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे लवकरच कळेल.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie
Titeeksha Tawde: ठरलं तर मग! अभिनेत्री तितीक्षा तावडे 'दृश्यम 2' फेम अभिनेत्यासोबत अडकणार विवाहबंधनात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com