पुणे : पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खान Salman Khan कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. सलमान आणि त्याची बहीण अलवीरा खान Alvira Khan या दोघांविरुद्ध फसवणूकिची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर समन्सदेखील सलमानला बजावण्यात आले आहे. Salman Khan accused of cheating
सलमान त्याच्या सोबत त्याची बहीण अलवीरा खान आणि 'बीइंग ह्युमन' Being Human कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तक्रार केलेल्या व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'बीइंग ह्युमन' कंपनीचे शोरूम खोलल्यानंतर कंपनीकडून दुकानासाठी कोणतेही सामान पाठवण्यात आलेले नाही आहे. या तक्रारीमुळे सलमान, अलवीरा यांसोबत 'बीइंग ह्युमन' कंपनीचे सीइओ प्रसाद कपारे आणि कर्मचारी संतोष श्रीवास्तव, संध्या, अनूप, संजय रंगा, मानव, आलोक यांना पोलिसांनी Police समन्स बजावले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, व्यापाऱ्याने चंदिगढ Changigarah येथे जवळपास तीन कोटी रुपयांचे सलमानच्या सांगण्यावरून ' बीइंग ह्युमन ज्वेलरी' चे शोरूम सुरू केले.
स्टाइल क्विंटेट ज्वेलरी यांच्यासोबत शोरूम सुरू करण्यासाठी एक करार देखील केला होता. त्यानुसार त्यांनी शोरूम तर उघडले परंतु, शोरूमसाठी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं सामान पाठवण्यात आले नाही. सोबतच ज्या दुकानातून बीइंग ह्युमन ज्वेलरी देण्याचं आश्वासन देण्यात आलेले होते, मागील अनेक महिन्यांपासून ते दुकान देखील बंद आहे. त्यामुळे सामान मिळणं व्यापाऱ्याला अवघड झाले होते. याशिवाय बीइंग ह्युमन वेबसाइटवर कॉलसाठी दिलेला नंबर देखील बंद आहे. असे त्याचे म्हणणे आहे.
१० दिवसात सलमानला द्यावं लागणार उत्तर:
सलमानला व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून समन्स पाठवण्यात आले आहेत. त्याचं १० दिवसात उत्तर देणे सलमानला अपेक्षित आहे. व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सलमानने स्वतः त्याला 'बिग बॉस' च्या सेटवर आमंत्रित केले होते. त्याला मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं. तक्रारदाराने एक व्हिडीओ सुद्धा पोलिसांना दिला आहे. त्या व्हिडिओत सलमानने त्याच्या शोरूमच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे म्हटले आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.