Actress Salma Agha’s Promising Bollywood Career Ended Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Salma Agha’s News : २ घटस्फोट अन् ३ लग्नामुळे अभिनेत्रीचं करिअर झालं खराब; देश सोडून गेली पाकिस्तानात पण...

Actress Salma Agha’s Promising Bollywood Career Ended : 'दिल के अरमां आसुओं में बह गए...' म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी गायिका आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सलमा आगा.

Chetan Bodke

'दिल के अरमां आसुओं में बह गए...' म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी गायिका आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सलमा आगा (Salma Agha). सलमा आगा यांनी आपल्या अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीमध्ये, ८०-९० चं दशक गाजवलं.

मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या सलमा आगा यांचा जन्म लंडनमध्ये झाला. लंडनमध्येच त्यांचं बालपण गेलं. खरंतर सलमा आगाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. त्या योगायोगाने अभिनेत्री झाल्या. सलमा यांना गायिका व्हायचं होतं पण त्या नशिबाने अभिनेत्री झाल्या. सलमा गाण्याच्या संदर्भात नौशाद साहब अली यांच्या घरी पोहोचल्या, जिथे त्यांची भेट चित्रपट निर्माते बी.आर.चोप्रा यांच्याशी झाली.

बी.आर.चोप्रा हे सलमा आगा यांच्या आवाज आणि शैलीमुळे पहिल्याच नजरेत अभिनेत्रीला चित्रपटाची ऑफर दिली. सलमा यांनी बी.आर.चोप्रा यांच्या चित्रपटाला नकार न देता त्यांच्या चित्रपटाची ऑफर स्विकारली. सलमा आगाने ‘पति पत्नी और तवैफ’, ‘उंचे लोग’, ‘जंगल की बेटी’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करत स्वतःची ओळख निर्माण केली. सलमा यांनी चित्रपटात अभिनय करत अनेक चित्रपटांत गाणीही गायली.

वयाच्या १६ व्या वर्षी लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीचा दोन वेळा घटस्फोट झाले आहे. १९८० मध्ये, बिझनेसमन महमूद सिप्रासोबत त्या रिलेशनशिपमध्ये होत्या. पण त्यांचे काही कारणास्तव लग्न झाले नाहीत. त्यानंतर १९८० मध्येच, सलमा यांनी जावेद शेख यांच्यासोबत लग्न केले. पण त्यांचे लग्नही फार काळ टिकले नाहीत. त्यांनीही लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट घेतला. यानंतर सलमाने १९८९ मध्ये स्क्वॅशपटू रहमत खानसोबत लग्न केलं.

२०१० मध्ये तिचं हे लग्नही मोडलं. या लग्नातून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दुसऱ्या घटस्फोटानंतर वयाच्या ५७ व्या वर्षी सलमा आगाने दुबईस्थित बिझनेसमन मंझर शाहसोबत तिसरे लग्न केले. या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत आली होती. त्यांनी पाकिस्तानातही काम करायला सुरुवात केली, पण तिला स्वतःच्या देशातही यश मिळालं नाही. सलमा सध्या मुलीसोबत मुंबईत राहत असून त्यांची मुलगी बॉलिवूडमध्ये काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dengue: डेंग्यू झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात?

सोन्याच्या भावात कचऱ्याचा डबा,कोट्यवधींचं कंत्राट, आयुक्त अनभिज्ञ कचऱ्याच्या डबे खरेदीत घोटाळा

Maharashtra Politics: मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ होणार? फडणवीस देणार बड्या मंत्र्यांना धक्का? वादग्रस्त मंत्र्यांचा पत्ता कट?

Devendra Fadnavis : CM देवेंद्र फडणवीस यांचा जलविद्युत प्रकल्पांसाठी ऐतिहासिक करार; तब्बल 15000 नोकऱ्या निर्माण होणार

Maharashtra Politics: धुळ्यात अजित पवार गटाची ताकद वाढली; औवेसींना मोठा धक्का मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

SCROLL FOR NEXT