Arbaaz Khan And Sohail Khan Will Host Bigg Boss 17 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Update: सलमान बिग बॉस 17 होस्टींग सोडणार! आता अरबाज आणि सोहेल करणार होस्टींग? वाचा सविस्तर

Weekend Ka Vaar: अरबाज आणि सोहेल होस्ट करणार 'बिग बॉस'

Pooja Dange

Isha - Abhishek Relationship in Bigg Boss House:

'बिग बॉस १७' सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. या दोन आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. 'बिग बॉस'चे घर जणू कुस्तीचा आखाडा झाला होता. काल 'वीकेंड का वार'चा पहिला भाग पार पडला. या भागात सलमानने अंकितासमोर आणि विकी जैनविषयी एक मोठा खुलासा केला. ज्यामुळे अंकिता खूप दुखावली गेली.

'बिग बॉस'च्या आजच्या भागाचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये अरबाज आणि सोहेल 'बिग बॉस' होस्ट करणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. याचसह 'बिग बॉस'च्या घरामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दाखविण्यात आले की, अरबाज आणि सोहेल कॉन्ट्रॅक्टविषयी बोलत असतात. ते दोघे बोलत असताना सलमानची एन्ट्री होतो. सलमान त्याच्या दोन्ही भावांना सांगतो, 'शुक्रवार- शनिवार मी 'बिग बॉस' होस्ट करणार आणि रविवारी तुम्ही शो रोस्ट करायचा.' त्यामुळे 'बिग बॉस'चा होस्ट बदलणार नसून शोच्या फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार आहेत. 'बिग बॉस १६'मध्ये देखील शेखर सुमनकडे रविवारचा भाग होस्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. (Latest Entertainment News)

सोशल मीडियावर 'बिग बॉस'चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 'बिग बॉस'च्या घरात समर्थ जुरेलची एन्ट्री झाल्याचे दाखविण्यात आले आहे. समर्थ जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची ओळख करून देताना 'बिग बॉस' सांगतात की 'घरामध्ये अशा सदस्यांची एन्ट्री होत आहे जो ईशा बॉयफ्रेंड असल्याचे सांगत आहे.'

समर्थ जुरेलला पाहून ईशा शॉक होते. त्यानंतर ती समर्थला विचारते 'तू बाहेर काय सांगितले आहेस?' तसेच समर्थ तू माझा फक्त मित्र आहेस असे म्हणते. यावरून त्या दोघांमध्ये खूप वाद होतातय. समर्थचे बोलण ऐकूण अभिषेक पुरता हादरून जातो. त्याचे अजूनही ईशावर प्रेम असल्याचे 'बिग बॉस'मध्ये येण्याआधी सांगितले होते. अभिषेक जोरजोरात रडायला लागतो. घरातील सर्व स्पर्धक त्याचे सांत्वन करतात.

समर्थ, ईशाविषयी काहीतरी सांगण्यासाठी घरातील सर्वांना बोलावतो. 'ईशा खोटारडी आहे. ती मला तिचा बॉयफ्रेंड म्हणून देखील स्वीकारत नाही', असे समर्थ सांगतो. त्यानंतर समर्थ आणि अभिषेकमध्ये जोरदार भांडण होतं.

समर्थसह आणखी एका स्पर्धकाची 'बिग बॉस'च्या घरामध्ये एन्ट्री झाली आहे. समर्थने येताच 'बिग बॉस'च्या घरामध्ये ठिणगी टाकली आहे. अभिषेक, ईशा आणि समर्थ त्यांच्यामुळे 'बिग बॉस'मध्ये काय राडे होणार हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT