Sakshi Tanwar Birthday : २००० च्या सुरुवातीला एकता कपूरने स्मृती इराणी, श्वेता तिवारी, आमना शरीफ सारख्या अनेक अभिनेत्रींना मुख्य अभिनेत्री म्हणून संधी दिली. त्यापैकी एक म्हणजे साक्षी तंवर जिने 'कहानी घर घर की' आणि ‘बड़े अच्छे लगते हैं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले होते आणि या तिच्या सर्वात लोकप्रिय मालिका ठरल्या. या मालिकेद्वारे साक्षी तंवर प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली
आज साक्षी तंवर तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्हीवर नाव कमावल्यानंतर साक्षीने चित्रपट आणि ओटीटीमध्येही आपली ओळख निर्माण केली. परंतु, साक्षी लग्न न करता एका मुलीची आई आहे. लग्न न करताही आई होण्याचा निर्णय तिने घेतला आहे. साक्षी तिच्या लाडक्या लेकीसोबत आनंदाने राहत असून काम संभाळून तिच्या मुलीला योग्य तो वेळ देत आहे.
साक्षी तंवरची सुरुवातीची कारकीर्द
साक्षी तंवरचा जन्म १२ जानेवारी १९७३ रोजी राजस्थानमधील अलवर येथे झाला. तिचे वडील निवृत्त सीबीआय अधिकारी आहेत. साक्षी तंवरने केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतले आणि पदवी शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला आली. दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर तिने काही काळ हॉटेलमध्येही काम केले. साक्षी तंवरने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि दूरदर्शनमध्ये काम केले. येथे साक्षीने 'अलबेला सूर मेला' (१९९८) या कार्यक्रमाची प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले. याच शोमध्ये एकता कपूरने साक्षी तंवरला पाहिले आणि तिच्या मालिकेसाठी तिला संपर्क साधला. २००० मध्ये, 'कहानी घर घर की' मालिकेतून साक्षीने काम करायला सुरुवात केली. यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
साक्षी तंवर चित्रपट
साक्षी तंवरने २००६ मध्ये 'ओ रे मनवा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात तिची भूमिका छोटी होती पण तिला पहिला मोठा ब्रेक दंगल (२०१६) या चित्रपटात मिळाला ज्यामध्ये तिने आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर, साक्षी 'मोहल्ला अस्सी' (२०१८) या चित्रपटात दिसली ज्यामध्ये तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका केली. यानंतर, साक्षी 'सम्राट पृथ्वीराज' (ऐतिहासिक नाटक) आणि 'कट्यार काळजात घुसली' (मराठी चित्रपट) मध्ये दिसली. साक्षी तंवरने मिशन ओव्हर मार्स (२०१९) या वेब सिरीजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.