Sairat Re-released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sairat Re- Re-released: ९ वर्षांनी 'सैराट' प्रेक्षकांच्या भेटीला; परश्या म्हणाला,'आमच्यासाठी स्वप्नगत...'

Sairat Re-released: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला आहे. आज पुन्हा मोठ्या पडद्यावर सैराट प्रदर्शित झाला आहे यानिमित्ताने आकाश ठोसरने एक पोस्ट शेअर केली आहे.

Shruti Vilas Kadam

Sairat Re- Re-released: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांना वेड लावले. 'सैराट' या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता. तसेच अजय -अतुल यांच्या उत्कृष्ट संगीतानेही या चित्रपटाच्या लोकप्रियतेला हातभार लावला.

या अभूतपूर्व यशानंतर 'सैराट' आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट आज म्हणजेच २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता 'सैराट'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या आठवणींना उचला देताना सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरने एक खास पोस्टसोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये आकाशने लिहिले, सैराट!!! पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता, आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा 9 वर्षांचं प्रवास तुम्ही बघतच आलाय. 9 वर्षांनी आज सैराट परत रिलीज होतोय याचा आम्हाला खरच खुप आनंद होत आहे. परत मोठ्या पडद्यावर आर्ची-परश्या म्हणून तुम्हाला भेटायला येतोय.

आकाश पुढे म्हणाला, हे शक्य झाल ते फक्त नागराज आण्णामुळे! सैराटमुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आणि त्याबद्दल मी आण्णांचा कायम ऋणी राहीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद ! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत “सैराटमय” व्हायला विसरू नका !!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT