Sairaj Kendre New Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Sairaj Kendre New Video: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ नंतर साईराजचा नवा रील, एका दिवसांत ६६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज

Sairaj Kendre New Reel: उद्या राज्यभरामध्ये श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्याचपूर्वी साईराज छोटा कान्हाच्या रुपामध्ये नवा रील घेऊन आला आहे. '

Priya More

Amchya Pappani Ganpati Anala Video Viral:

'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' या गाण्यावरच्या रिलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील चिमुकल्या साईराजच्या एक्स्प्रेशनने तर साऱ्यांची मनं जिंकली आहेत. सध्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये दिसतोय तो म्हणजे साईराजचा हाच व्हिडिओ. साईराजच्या या व्हिडिओला अवघ्या काही दिवसांमध्येच ३६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. सध्या साईराजचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. या व्हिडिओने साईराज रातोरात स्टार झाला. गणेशोत्सवाच्या आधीच साईराजचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे. अशामध्ये आता साईराज नवा रील व्हिडिओ घेऊन आला आहे.

उद्या राज्यभरामध्ये श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्याचपूर्वी साईराज छोटा कान्हाच्या रुपामध्ये नवा रील घेऊन आला आहे. 'नजरेचा मारू नको बाण ग ...माझा जाईल प्राण ग' या गाण्यावर साईराजने रील तयार केले आहे. त्याच्या आधीच्या 'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' या रीलप्रमाणेच त्याने मन जिंकणारे एक्स्प्रेसशन दिले आहेत. हा चिमुकला गोविंदा सर्वांना प्रचंड आवडत आहे.

या व्हिडिओमध्ये साईराजने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. गोविंदा डोक्याला बांधतात तशी केशरी रंगाची रिबीन आणि त्यावर मोरपीस आणि कपाळी टिळा असा लूक त्याने केला आहे. या गाण्यातून साईराजच्या डोळ्यांचे एक्स्प्रेशन तर खतरनाक आहेत. त्यात त्याने ज्या पद्धतीने बाण मारण्याची स्टाईल केली आहे ती देखील जबरदस्त आहे. साईराजच्या या नजरेचा बाण थेट लोकांच्या काळजाला मध्येच घुसला आहे.

साईराजच्या या नव्या व्हिडिओला अवघ्या १ दिवसांमध्ये ६६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७ लाख ५७ हजार लाईक्स मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट करत 'तू जर असेच रिल्स बनवत राहिलास तर, बाकिचे स्टार घरी बसतील माश्या मारीत...मस्त बाळा', अशी कमेंट केली आहे. तर काहींनी त्याच्या स्माईलचे कौतुक केले आहे. तर आणखी एका युजरने, बाळा खरोखर खूप भारी अ‍ॅक्टिंक करतोय रे. खूप मोठा होशिल एक दिवस', अशी कमेंट केली आहे.

साईराज केंद्रे या चिमुकल्याचे हे रील्स गणेश केंद्रे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. अवघ्या ४ वर्षांचा असलेला साईराज आज सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे. हा चिमुकला बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी या गावातील रहिवासी आहे. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडीमधील माऊली अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये साईराज शिकतो. साईराजने शाळेच्या गणवेशात व्हिडिओ शूट केल्यामुळे त्याच्या शाळेचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून साईराज हा स्टारच झाला आहे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT