Sai Tamhankar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar : तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल; सई ताम्हणकरणं सांगितला विचित्र प्रसंग, मुलाखतीत बरेच धक्कादायक खुलासे

Sai Tamhankar Experience : सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या सईने एक धक्कादायक खुलासा केलाय. तिने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला विचीत्र प्रसंग सांगितला आहे.

Shreya Maskar

मोहिनी सोनार - साम टीव्ही

बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटिफुल अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. तिनं आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमे केलेत. याशिवाय तिनं बॉलिवूडमध्येही चांगलं नाव कमावलं आहे. एवढंच नाही तर मिमी या बॉलिवूड फिल्मसाठी तिला अवॉर्डही मिळालाय. मिमी, हंटर, भक्षक यासह अनेक वेब सिरीजमध्ये सईनं उत्तम काम केलंय. पण सई सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सई ताम्हणकरनं कास्टिंग काऊचबाबत वक्तव्य केलंय. सई कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचं तिनं एका मुलाखतीत म्हटलं आहे. तिला एकानं डायरेक्टर आणि हिरोसोबत काँप्रोमाईज करण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मिस मालिनी या शोच्या मुलाखतीत सई ताम्हणकरनं हा धक्कादायक खुलासा केलाय.

सईसोबत घडलेला 'तो' प्रसंग

सईनं म्हटलंय, "ही खूप दिवसांआधीची गोष्ट आहे. मात्र ती माझ्यासाठी तितकीच क्लेशदायक आणि त्रासदायक आहे. सईनं म्हटलं, एकदा मला एका व्यक्तीचा कॉल आला होता. जो फिल्म रिलेटेड गोष्टी मॅनेज करायचा. त्यानं मला सांगितलं तुझ्यासाठी एक फिल्म आहे. पण त्यासाठी तुला काहीतरी द्यावं लागेल. या फिल्मसाठी डायरेक्टर आणि प्रोड्यूसरसोबत काँप्रोमाईज करावं लागेल. त्यांच्यासोबत झोपावं लागेल. त्यानं म्हटलं खरं तर तुम्हाला हिरोसोबत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण मी तुम्ही आहात म्हणून डायरेक्टर आणि प्रोड्यूसरबाबत बोलतोय." हे ऐकून सई ताम्हणकरनं क्षणाचाही विचार न करता त्याला जोरदार उत्तर दिलं आणि म्हटली, असं असेल तर तुम्ही तुमच्या आईला का नाही पाठवत? हे ऐकून तो माणूस 10 सेकंद गप्प बसला आणि त्यानंतर मीच त्याला म्हटले, आता तुम्हाला कळलं असेल की यापुढे तुम्ही मला कधीही कॉल करायचा नाही आणि सईनं फोन कट केला.यानंतर सईला असा कॉल कधीही पुन्हा नाही आला. तिनं म्हटलं तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल, तर त्याच क्षणी तुम्ही आवाज उठवा आणि बोला. नाहीतर पुढे तुम्ही अडचणीत येऊ शकता. सध्या सईच्या या धाडसाचं आणि तिनं स्वतःसाठी घेतलेल्या स्टँडचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT