Sai Tamhankar New House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar : सई ताम्हणकरचा नादच खुळा!, वाढदिवशी स्वतःलाच दिलं भन्नाट गिफ्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री आणि नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सई ताम्हणकरचा वाढदिवस स्पेशल ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री आणि नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) वाढदिवस स्पेशल ठरला आहे. सई ताम्हणकरनं तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला. सईला तिच्या चाहत्यांसोबातच जगभरातून तिचा मित्रपरिवार वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पण यंदाच्या वर्षीचा तिचा वाढदिवस (Birthday) हा अधिकच स्पेशल ठरला आहे. कारण सईने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच नवीन घर घेऊन स्वतःलाच खूप मोठी भेट दिली आहे.

सई ताम्हणकरचा २००८ साली आलेल्या 'सनई- चौघडे' या चित्रपटापासून सुरु झालेला हा प्रवास बॉलिवूडच्या सिल्व्हर स्क्रीनपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सांगलीहून अभिनयाची आवड म्हणून आलेल्या या मुलीने आज मुंबईमध्ये स्वतःचं घर घेण्यापर्यंतचा प्रवास गाठला आहे. स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच घर घेतल्यामुळे तिला आनंद अनावर झाला आहे.

स्वतः सईने याबद्दल कोणतीही बातमी शेअर केली नाही. परंतु, सई ताम्हणकरचा मित्र आणि निर्माता अनिश जोग आणि सईचा भाऊ सचिन गुरवने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनिशने तिच्या फोटोंचा एक व्हिडिओ बनवून त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओखाली त्याने 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅजिक! तू जग जिंकावे अशी माझी इच्छा आहे!', असे कॅप्शन लिहिले आहे.

सई ताम्हणकरच्या 'गर्लफ्रेंड', 'धुरळा', 'YZ', 'टाइम प्लीज' अशा अनेक चित्रपटांचा अनिश हा निर्माता आहे. त्याने हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून अनेक चाहते तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार कमेंट करून सईला नवीन घरासाठी आणि वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देत आहेत. अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री श्रेया बुगडेने सईला तिच्या नवीन घराबद्दल आणि वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

SCROLL FOR NEXT