Sai Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar: महाराष्ट्राने दिलेली ही शाबासकी आहे...; ११ वर्षांनी सई ताम्हणकरला मिळाला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार

Sai Tamhankar Win Award: अभिनय असो किंवा फॅशन जिच्या चर्चा या कायम बघायला मिळतात अशी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या कामाचा आलेख हा कायम उंचावत आहे.

Shruti Vilas Kadam

Sai Tamhankar: अभिनय असो किंवा फॅशन जिच्या चर्चा या कायम बघायला मिळतात अशी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर ! सईच्या कामाचा वाढता आलेख हा कायम उंचावत असतो आणि अश्यातच सईला पाँडिचेरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पाँडिचेरी चित्रपटासाठी सई उत्कृष्ठ अभिनेत्री ठरली असून या चित्रपटाची खासियत म्हणजे सईची यातली लक्षवेधी भूमिका. तिचा या चित्रपटातील अभिनय अनेक गोष्टी साठी चर्चेत राहिला तो म्हणजे तिचा साधा सरळ पण तितकाच लक्षवेधी लूक, अनेक भाषा मधला तिचा या चित्रपटातील संवाद आणि एका मुलाच्या आईची भूमिका. पाँडिचेरी मधल निकिता हे पात्र बहुगुणी ठरलं अस म्हणणं वावगं ठरणार नाही आणि म्हणून सई पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे.

या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना सई ताम्हणकर म्हणते "पाँडिचेरी या संपूर्ण चित्रपटाचा अनुभव खूप वेगळा आणि कमाल होता आम्हाला कोणत्याही कलाकाराला या चित्रपटासाठी स्टाफ नसताना हेअर करणं , स्वतःचा ठरलेला कॉस्च्युम घालून रेडी होऊन येणं अस सगळ काही स्वतःच स्वतःला काम करताना एक स्वावलंबी झाले आणि म्हणून आज मी एवढी स्वावलंबी झाली की कुठल्याही चित्रपटाच्या सेटवर मी स्वतःच स्वतःहा सगळं करू शकते आणि हे फक्त पाँडिचेरी मुळे शक्य झालं. पाँडिचेरी मधली निकिता ही भूमिका माझ्यासाठी जीवाच्या अत्यंत जवळची आहे कारण ही अशी भूमिका होती ज्यासाठी खूप अभ्यास करावा लागला होता. शहराचा एक फ्लेवर उतरतो चित्रपटात तसा पाँडिचेरीचा फ्लेवर अगदी सुंदररित्या यात उतरला आहे सचिन कुंडलकर हा असा एक दिग्दर्शक आहे ज्याचा एस्थेक्टिक सेन्स खूप कमाल आहे आणि तो पाँडिचेरी मध्ये असल्याने हा चित्रपट आणि त्यातली निकिता उत्तम दिसून आली आहे.

मला महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा एवढा मोठा पुरस्कार आणि तो देखील उत्तम अभिनेत्री साठी देण्यात आला या साठी मी कृतज्ञ आहे. आपल महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक विभाग यांचे खूप आभार.आपल्या कामाची दखल जेव्हा महाराष्ट्र शासन घेत आणि आपल्याला एवढा मोठा पुरस्कार देत तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो आणि खूप आनंद देखील होतो. मला पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2011 साली दुनियादारी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक्क अभिनेत्री म्हणून मिळाला होता आणि आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिळाला म्हणून तो तितकाच खास आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याने दिलेली ही शाबासकी आहे असं मला वाटतं. मराठी सिनेमाची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिल्याबद्दल सांस्कृतिक विभाग आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार"

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना आईचा सल्ला; “जरा शांत राहा”|VIDEO

Somvar Ke Upay: भगवान शंकरांना प्रिय आहेत 'या' 5 गोष्टी; सोमवारच्या दिवशी अडचणींपासून मुक्ततेसाठी करा हे उपाय

Ladki Bahin Yojana: ...तर या लाडक्या बहिणींचे १५०० बंद होणार, सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेना मंत्र्यांवर नाराज? बैठकीत खडेबोल सुनावले, राज्याच्या राजकारणात खळबळ!

जपानची बुलेट ट्रेन कशी दिसते? साम टीव्हीच्या कॅमेऱ्यातून पाहा EXCLUSIVE VIDEO

SCROLL FOR NEXT