Shree Devi Prasanna Saam Digital
मनोरंजन बातम्या

Sridevi Prasanna: 'श्रीदेवी प्रसन्न'ची 'नारीशक्ती', सई ताम्हणकरने शेअर केले खास फोटो

Sridevi Prasanna: हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर 'नारी शक्ती' अनुभवयाला मिळते. सध्या सई ताम्हणकर तिच्या आगामी " श्रीदेवी प्रसन्न " या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये रमली आहे आणि तिने आज एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर केला आहे.

Sandeep Gawade

Sridevi Prasanna

एखादा चित्रपट म्हंटला की भले मोठे कॅमेरे त्यामागची टीम आपल्या डोळ्यासमोर येते, पण सध्याचा जमाना तसा थोडा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर 'नारी शक्ती' अनुभवयाला मिळते. सध्या सई ताम्हणकर तिच्या आगामी " श्रीदेवी प्रसन्न " या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये रमली आहे आणि तिने आज एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर केला. तिच्या फोटोमधल्या या सगळ्या मुली नक्की कोण? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

सई या फोटो बद्दल सांगताना बोलते "आमच्या सेटवर सण होता आणि सगळे छान पारंपरिक लूकमध्ये आले होते एक आठवण म्हणून काढलेला हा फोटो तर आहे पण गंमत म्हणजे या फोटोमधल्या सगळ्या मुली तुम्हाला चित्रपटात एका सीन मध्ये बघायला सुद्धा मिळणार आहेत. या फोटोमधली प्रत्येक स्त्री या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिरेक्शन डिपार्टमेंट , कॉस्ट्यूम डिपार्टमेंट हेड स्नेहा सोबतीला चित्रपटाची लेखिका अदिती मोघे आणि या चित्रपटाची ऑनलाईन एडिटर अशा या मुलीची ही खास गोष्ट असलेला हा पॉवर गर्ल फोटो आहे, असे सई सांगते. सईच्या या 'पॉवर गर्ल' ची ही खास गोष्ट सेटवर असलेली स्त्री सक्षमीकरण दाखवून देते. चित्रपट कुठला ही असो इंडस्ट्रीत होणार हे स्त्री सक्षमीकरण नक्कीच उल्लेखनीय आहे यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT