Kiran Mane: 'निव्वळ निवडणुकांसाठीचे गाजर...' मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत!

Kiran Mane Viral Post On Maratha Aarkshan: एकीकडे मराठा बांधव विजयोत्सव साजरा करत असतानाच नुकतेच ठाकरे गटात प्रवेश करुन राजकारणात सक्रिय झालेले लोकप्रिय मराठी अभिनेते किरण माने यांनी सरकारच्या अध्यादेशावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Kiran Mane On Maratha Aarkshan:
Kiran Mane On Maratha Aarkshan:Saam Tv
Published On

Kiran Mane On Maratha Reservation:

आजचा दिवस मराठा बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर मोठे यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर राज्यभर मराठा बांधवांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा बांधव विजयोत्सव साजरा करत असतानाच नुकतेच ठाकरे गटात प्रवेश करुन राजकारणात सक्रिय झालेले लोकप्रिय मराठी अभिनेते किरण माने यांनी सरकारच्या अध्यादेशावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणालेत किरण माने?

अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते राजकीय वर्तुळातील घडामोडींवर, विविध घटनांवर परखडपणे आपले मत व्यक्त करतात, सध्या त्यांची मराठा आरक्षणाच्या निकालानंतरची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सरकारच्या अध्यादेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

तहात हरु नका...

"मराठा बांधवांनो, तहात हारू नका. सदर अध्यादेश १६ फेब्रूवारी २०२४ पासून किंवा त्यानंतर लागू होईल." आणि "... यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील." हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे. निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा, असे सुचक विधान केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kiran Mane On Maratha Aarkshan:
Chhatrapati Sambhaji: 'पहिल्यांदाच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली', रजित कपूर साकारणार औरंगजेबाची भूमिका

मनोज जरांगेंचे केले होते कौतुक...

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी किरण माने यांनी फेसबूक पोस्ट करत मराठा बांधवाच्या लढ्याचे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. मनोज जरांगे पाटील फक्त मराठ्यांसाठीच नाय, तर समस्त बहुजनांसाठी लै लै लै मोलाचा मानूस हाय. आज हुकूमशहांच्या दहशतीपुढं न्यायपालिका, मिडीया, प्रशासन, नेते यांच्यापास्नं 'सो काॅल्ड' धर्मगुरूंनीही लोटांगन घातलेलं घातलं असताना स्वाभिमान जपून संवैधानिक मार्गानं त्यांनी रस्त्यावर उतरवलेला दमदार, बलवान मराठा समाज उद्याच्या क्रांतीची मशाल पेटवतोय, असे ते या पोस्टमध्ये म्हणाले होते. (Latest Marathi News)

Kiran Mane On Maratha Aarkshan:
Shahrukh Khan Dunki Special: 'डंकी'चा परदेशातही डंका, शाहरुख खानच्या चित्रपटाचं यूकेच्या संसदेत होणार स्पेशल स्क्रीनिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com