Sahdev Dirdo Road Accident: 'बचपन का प्यार फेम' सहदेवचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत...  Instagram/@viralboy_sahdev
मनोरंजन बातम्या

Sahdev Dirdo Road Accident: 'बचपन का प्यार फेम' सहदेवचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत...

सहदेवच्या (Sahdev Dirdo) अपघातानंतर बॉलिबुड रॅपर बादशहा (Badshah) याने दुःख व्यक्त करत तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुकमा, छत्तीसगड: 'बचपन का प्यार' फेम व्हायरल बॉय सहदेव दिरदो याचा बाईकवरुन पडून अपघात झाला आहे. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सहदेवच्या (Sahdev Dirdo) अपघातानंतर (Accident) बॉलिबुड रॅपर बादशहा (Badshah) याने दुःख व्यक्त करत तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे, त्याचप्रमाणे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल (Bupesh Baghel) यांनीही त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. (Sahdev Dirdo Road Accident: 'Bachpan Ka Pyaar Fame' Sahdev's Accident; Serious head injury ...)

हे देखील पहा -

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार सहदेव हा आपल्या दोन मित्रांसोबत बाईकवरुन ट्रिपल सीट शबरी नगर येथे जात होता. दरम्यान रस्त्यात एका ठिकाणी वाळू असल्याने बाईक घसरली आणि हा दुर्देवी अपघात (Accident) झाला. या अपघतानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून चार टाकेही पडले आहेत. जवळपास पाच तासांनंतर तो शुद्धीवर आला आहे. आता सहदेवची प्रकृती स्थिर आहे.

कोण आहे सहदेव?

'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरडो छत्तीसगडच्या सुकमाचा रहिवासी आहे. त्याच्या गाण्यांवर अनेक रील Reels देखील बनवण्यात आल्या आहेत. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बॉलिबुड सिंगर बादशाहने त्याच्यासोबत एक व्हिडिओ सॉंग शूट केलं होतं. एवढंच नाही तर खुद्द छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी त्याची भेट घेत त्याचं कौतुक केलं होतं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT