क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. खूप वेळापासून सारा तेंडुलकरचे नाव बॉलिवूडच्या अभिनेत्यासोबत जोडले जात आहे. आता या संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ब्रेकअप झाला आहे. सारा आणि सिद्धांतने एकमेकांना त्यांच्या कुटुंबियांशी ओळख करून दिली. सर्व कुटुंबाची एक भेट झाली. त्यानंतर त्याच्यात दुरावा आला आहे. असे म्हटले जात आहे की, सिद्धांत चतुर्वेदीने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांच्या कुटुंबाची भेट घेतली म्हणजे त्यांच्या नात्यांची गंभीरता दिसून येते. मात्र अद्याप सिद्धांत आणि साराने यावर कोणतेही भाष्य केले नाही आहे. तसेच अद्यापही ब्रेकअपचे कारण स्पष्ट झाले नाही आहे.
सिद्धांत चतुर्वेदी आधी खूप काळापासून सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळाली होती. सारा तेंडुलकर मॉडेलिंग आणि ब्रॅन्डच्या कामामध्ये कायम व्यस्त असताना पाहायला मिळते. आपल्या हटके लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती कायम इन्स्टाग्रामवर शेअर करत राहते.
सिद्धांत चतुर्वेदीला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. 'गहराइयां' त्याने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाला. काम केले आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. उदा. 'युध्रा', 'खो गये हम कहां', 'गली बॉय' आता लवकरच सिद्धांत चतुर्वेदी त्याचा आगामी चित्रपट 'धडक 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटा त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.