Sthal Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sthal Movie : 'पाहुणे येत आहेत पोरी...' सचिन पिळगावकर यांच्या 'स्थळ' चित्रपटाचे गाणं सुपरहिट

Pahune Yet Aahe Pori Song : मराठी सुपरस्टार सचिन पिळगावकर यांच्या 'स्थळ' चित्रपटातील 'पाहुणे येत आहेत पोरी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shreya Maskar

लग्नासाठी स्थळ (Sthal ) पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारे 'पाहुणे येत आहेत पोरी...' (Pahune Yet Aahe Pori Song) हे 'स्थळ' चित्रपटातलं गाणे लाँच करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.'स्थळ' हा चित्रपट महिला दिनानिमित्त ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी स्थळ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे.

अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट 'स्थळ' या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. "पाहुणे येत आहेत पोरी..." हे गाणं मीराबाई येते आणि आशिष नारखेडकर यांनी गायलं आहे. जयंत सोमलकर यांच्या शब्दांना माधव अगरवाल यांनी स्वरसाज चढवला आहे. हार्मोनियम आणि गाण्याचा नेमका ठेका यांनी गाण्यातल्या शब्दांना आणखी रंजक केलं आहे.

चित्रपटात पारंपरिकपणे गायिकांकडून गाणी गाऊन घेतली जातात. मात्र 'स्थळ' चित्रपटातले हे गाणं गाण्याची आवड असलेल्या पण व्यावसायिक नसलेल्या मीराबाई या चंद्रपूरनजीकच्या महिलेने गायलं आहे. चाहते 'स्थळ' हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आज रद्द

Mumbai Airport: मुंबई आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO

KBC: विराट कोहलीच्या फ्लाइंग किसवर अमिताभ बच्चन यांचा यॉर्कर; अनुष्का शर्मा क्लीनबोल्ड

Vice president election: काँग्रेसच्या चालीमुळे एनडीएच्या मित्रपक्षासमोर पेच, उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपला चेकमेट

Pre Diabetes : प्री-डायबिटीजची लक्षणे ओळखा; योग्य आहाराने रोखा मधुमेहाचा धोका

SCROLL FOR NEXT