Sachin Pilgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीत ‘अशी ही बनवाबनवी’ हा एक क्लासिक कॉमेडी चित्रपट मानला जातो. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं नाही तर सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शन कौशल्यालाही नवी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाच्या रिलीजच्या काळातील एक गंमतीशीर प्रसंग स्वतः पिळगावकरांनी अलीकडेच एका मुाखतीत सांगितला आहे.
पिळगावकर म्हणाले, अशी ही बनवाबनवी जेव्हा रिलीज झाला होता ना तेव्हा इतकी तारीफ झाली इतक सगळ झालं. मला आठवतं तेव्हा आम्ही जूहुच्या अपार्टमेंटमध्ये राहायला होतो. तेव्हा आमच्या घरातल्या बाथरूमचा शावर खराब झाला होता त्यावेळी मी बादली भरून मी थंड पाण्याने अंघोळ करायचो. नेहमीप्रमाणे नळ ओपन केला आणि मी पाणी भरण्याची वाट पाहू लागलो. मी विचार करु लागलू हा पिक्चर चांगल झाल आहे. आपल्या हातून पण खूप चांगल पिक्चर बनवलंय. लोक खूप स्तुती करताहेत. त्याला सक्सेस मिळालेला आहे. स्वतःमध्ये विचार करता करता बादली भरली आणि मी नळ बंद करायला लागलो पण नळ बंदचं होत नव्हता. मी खूप प्रयत्न केला. बंद करायचा. तो बंद होईना. मी पॅनिक झालो. मी म्हटलं, हे काय झालं? असं का होतंय?
पिळगावकर पुढे म्हणाले, नंतर मला कळलं की मी उलट्या दिशेने फिरवत होतो चावी. ती बंद नाही होऊ शकणार असं फिरवलं तर बंद होणार नाही अशाच बाजूनी फिरवायचा प्रयत्न करतो तर तो नळं कसं बंद होणार? मी नळं बंद केला आणि मी थांबलो. मी म्हटलं, पिळगावकर तुम्हाला पाण्याचा नळ बंद करता येत नाही. तुम्ही काय मिजास करता कि तुम्ही एवढं चांगलं मोठं पिक्चर बनवलं. जेवढं मोठं सक्सेसफुल झालं कुठल्या अँगलने तुम्ही हा विचार करत आहात.
हा प्रसंग सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी या प्रसंगावरुन पिळगावकरांना रोस्ट करत वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एक नेटकऱ्याने लिहीले, यांचा गैरसमज झालाय की अमर्याद फेकाफेक केली की पंटर परधान होता येतं... आणखी एकाने कमेंट केली, लाल गंधर्व आजुन काय काय शोध लावणारे देवाला माहीत. आणखी एकाने लिहीले, फेकण्याचे एक ना अनेक प्रकार पैकी एक म्हणजे आपण नळ बंद करताना
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.