Satvya Mulichi Satvi Mulgi  Instagram
मनोरंजन बातम्या

Saatvya Mulichi Saatvi Mulgi: 'आई कुठे काय करते' नंतर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Marathi Serial Update: 'आई कुठे काय करते' नंतर आता झी मराठी वरील लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Manasvi Choudhary

'आई कुठे काय करते' नंतर आता झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठीवर अनेक नवीन मालिका सुरू होत आहेत अशातच जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतानाचे प्रोमो रिलीज होत आहेत.

झी मराठी वाहिनी मागील २५ वर्षापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. मालिका आणि प्रेक्षकांचे हे नाते अधिक घट्ट होत असताना मालिका निरोप घेणार असल्याने प्रेक्षक देखील नाराज होत आहेत.

कधी झाली मालिका सुरू

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. १२ सप्टेंबर २०२२ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या थ्रीलर मालिकेतून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. गेली २ वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका रोज रात्री १०. ३० वाजता सुरू व्हायची.

मालिकेत या कलाकारांची मांदियाळी

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मराठीतील अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, एकता डांगर, श्वेता मेहेंदळे, अभिजीत केळकर ही कलाकार मंडळी होती. या कलाकारांची धमाल मस्ती या मालिकेत पाहायला मिळाली.

या नवीन मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका संपल्यानंतर कोणती नवीन मालिका येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले असताना झी मराठीवर येत्या काही दिवसांत 'तुला जपणार आहे', 'इच्छाधारी नागीण', 'लक्ष्मी निवास' या मालिका सुरू होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

महिलांसाठी मोफत बससेवा, तरुणांना मोफत टॅबलेट; मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

मराठी सक्तीच्याविरोधात रिक्षा-टॅक्सीचालकांची हायकोर्टात धाव; निर्णय स्थगितीची मागणी

Kalyan Tourism : एक दिवसाची भन्नाट ट्रिप! फिरा कल्याणजवळची ५ बेस्ट मॉन्सून पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT