Tatyana Ozolina Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tatyana Ozolina Accident : रशियातील सर्वात सुंदर बाइकरचा रस्ते अपघातात मृत्यू, सोशल मीडियावर होते ८ मिलियन फॉलोवर्स

Tatyana Ozolina Accident News : रशियातील सर्वात सुंदर बाइकर ओझोलिना हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ओझोलिनाचे सोशल मीडियावर ८ मिलियन फॉलोवर्स होते. तिच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Siddhi Hande

रशियाची प्रसिद्ध बाईक रायडर ओझोलिना हिचा तुर्कीमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये ओझोलिनाचे बाइकवरील नियंत्रण सुटले.त्यानंतर तिची दुचाकी समोर असलेल्या ट्रकला खडकली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ओझोलिना तिचा लाल रंगाची BMW S10000 RR 2015 चालवत होती. मुग्ला आणि बोरडम रिसॉर्टच्या मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ओझोलिना बाईक चालवत होती. समोरुन येणारा ट्रक पाहून ओझोलिनाचे लक्ष विचलित झाले. तिने शेवटच्या क्षणी ब्रेक दाबला. मात्र, तोपर्यंत ट्रकने दुचाकीला धडक दिली होती.

ओझोलिनासोबत आणखी एक ओनुर ओबुत नावाचा बाइकस्वार बाइक चालवत होता. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णावाहिका घटनास्थळी पोहचण्यापूर्वी ओझोलिनाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओझोलिना फक्त ३८ वर्षांची होती. तिला रशियातील सर्वात सुंदर बाइकर म्हणून घोषित करण्यात आले होते. तिचे सोशल मीडियावर ८ दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स होते.

ओझोलिनाला २०२३ मध्यो मोटोब्लॉगर ऑफ द इअर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ऑफ द इअर ही पदवी मिळाली होती. ओझोलिनाला १३ वर्षांचा मुलगा आहे. ओझोलिनाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT