Rupali Ganguli saam Tv
मनोरंजन बातम्या

Rupali ganguli : अनुपमाच्या सेटवर दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू, रुपाली गांगुलीला गंभीर दुखापत

Anupama set accident: अनुपमा मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका कॅमेरा असिस्टंटचा मृत्यु झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनुपमा फेम रुपाली गांगुली ही अनुपमा मालिकेमुळे घराघरात पोहचली आहे. यापूर्वी रुपालीने साराभाई वर्सेस साराभाई सारख्या हिट शो मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली होती. परंतु अनुपमा मालिकेतून तिने लाखो लोकांच्या मनात आपल्या हक्कात स्थान निर्माण केले.आपल्या अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली. आणि प्रत्येक घरातल्या महिलेची तिला साथ मिळाली. मात्र, रुपाली गांगुली ही सध्या आपल्या वैयक्तिक जीवनामुळे जास्त चर्चेत आहे.

अनुपमा मालिकेमुळे रुपाली गांगुली पुन्हा एकदा चर्चेत आहे. अनुपमा मालिकेच्या सेटवरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालिकेच्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. मालिकेच्या सेटवर एका कॅमेरा असिस्टंटचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. सेटवर काम करत असताना विजेच्या धक्का लागून त्याचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप मालिकेच्या प्रोडक्शन कडून याबद्द्ल अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुपमा मालिकेच्या सेटवर मृत्यु झालेल्या कॅमेरा असिस्टंट हा मूळचा बिहारचा आहे. तो मालिकेच्या थर्ड पार्टी साई व्हिडिओ कंपनीसोबत काम करत होता.अनुपमा मालिकेच्या शुटिंग साठी कॅमेरा आणि कॅमेरामॅन हे बाहेरुन येतात. म्हणजेच यांचा करार हा दुसऱ्या कंपनासोबत असतो. अनुपमा मालिकेच्या शुटिंगसाठी 'साई व्हिडिओ' कंपनीकडून कॅमेरा आणि कॅमेरा असिस्टंट येतात.

मालिकेच्या शुटिंग सुरु असताना कॅमेरा असिस्टंटच्या पायाला विजेचा धक्का लागला त्यावेळी त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. कंपनीने त्याला नुकसान भरपाई देण्याचे सांगितले आहे. तसेच त्याच्या अंतिम संस्काराचा खर्च देखील कंपनी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचा अंतिम संस्कार बिहार मध्ये होणार आहे. पार्थिव शरीराला बिहारला घेऊन जाण्यासाठी त्याचा भाऊ मुंबई मध्ये दाखल झाला आहे. १४ नोव्हेंबर रोजी शुटिंग दरम्यान ही घटना घडली होती. त्यानंतर या घटनेची माहिती आरे कॅालनी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून चौकशी केली. मात्र, अद्याप पोलिस आणि मालिकेच्या निर्मात्यांकडून कोणतीही माहिती मीडियाला देण्यात आली नाही

अनुपमा मालिका ही कमी वेळेतच चाहत्यांच्या मनात घर करुन गेली. अनुपमा मालिका टिव्हीवरील हीट मालिकेच्या अग्रस्थानी आहे. या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये बाकिच्या सर्व मालिकेनां मागे टाकले आहे.या मालिकेत रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना मुख्य भूमिकेत आहे.

Edited by: Priyanka Mundinkeri

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT