Pati Patni Aur Panga: "बिग बॉस सीझन १४" जिंकल्यानंतर, रुबीना दिलीकने तिचा पती अभिनव शुक्लासोबत "पती, पत्नी और पंगा" देखील जिंकला. पहिल्या सीझन जिंकल्यानंतर ट्रॉफी घेतनाचा फोटो ऑनलाइन व्हायरल होत आहेत आणि सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या कपलचे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या क्लिप्समध्ये "पती, पत्नी और पंगा सीझन १" मधील टॉप दोन कपल दिसत आहेत. गुरमीत चौधरी- देबिना मुखर्जी आणि रुबीना दिलीक - अभिनव शुक्ला. होस्ट सोनाली बेंद्रे घोषणा करते की "पती, पत्नी और पंगा" मधील विजेती जोडी अभिनव आणि रुबीना आहे. त्यानंतर कलाकार नाचायला सुरुवात करतात आणि गुरमीत आणि देबिना टाळ्या वाजवतात.
"पती, पत्नी और पंगा" शो तीन महिन्यांनंतर बंद
ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू झालेला हा शो तीन महिन्यांनी १६ नोव्हेंबर रोजी संपला. त्याची जागा "लाफ्टर शेफ्स सीझन ३" ने घेतली, जो २२ नोव्हेंबरपासून टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे. "पती पत्नी और पंगा" मध्ये हिना खान, स्वरा भास्कर, गीता फोगट, सुदेश लाहिरी, देबिना बॅनर्जी, ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि अविका गोर हे कलाकार आणि त्यांचे पार्टनर होते.
रुबिना दिलीकने उचलली ट्रॉफी
हा शो जिंकल्यानंतर या कपलने सांगितले की या शोमुळे त्यांना रोजच्या जबाबदाऱ्यांच्या धावपळीत एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितले की, इतरांप्रमाणेच त्यांच्यातही त्रुटी आणि कमतरता आहेत आणि आता त्यांना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.