Imtiaz Ali Love Life Saam TV
मनोरंजन बातम्या

HBD Imtiaz Ali : बॉलिवूडचा रोमॅन्टिक डायरेक्टर खऱ्या आयुष्यात प्रेमाच्या शोधात; खासगी लव्ह लाईफही फिल्मी

Imtiaz Ali Love Story: रोमँटिक चित्रपटांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इम्तियाज अलीचे लव्ह लाईफ आणि वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.

Pooja Dange

Celebrating Imtiaz Ali Birthday : बॉलीवूडला चित्रपटसृष्टीला 'रॉकस्टार', 'जब वी मेट' आणि 'हायवे' सारखे चित्रपट देणारे स्टार फिल्ममेकर इम्तियाज अली यांचा आज 52 वा वाढदिवस आहे. 16 जून 1971 रोजी जमशेदपूर, झारखंड येथे जन्मलेल्या इम्तियाजचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स, पटना येथे झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी जमशेदपूरला गेले.

त्या काळात इम्तियाज त्याच्या मावशीच्या घरी शिकत असत. यासोबतच ते अनेकदा जवळच्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपटांचा आनंद घेत असे. इथूनच त्यांना चित्रपटांची आवड वाढली. जमशेदपूरमध्येच त्यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तेथेच त्यांच्या पटकथा लेखनाला सुरुवात झाली.

रोमँटिक चित्रपटांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इम्तियाज अलीचे लव्ह लाईफ आणि वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. तर या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या रोमँटिक लव्ह लाईफसोबतच त्यांच्या चित्रपटांवरही एक नजर टाकूया. (Latest Entertainment News)

इम्तियाज अली यांची गणना बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम दिग्दर्शकांमध्ये केली जाते. इम्तियाज यांनी चित्रपटांतून प्रेमाची एक वेगळी व्याख्या सांगितली आहे, ज्याच्याशी प्रत्येक प्रियकर स्वतःला कनेक्ट करतो. इम्तियाजचे रोमँटिक चित्रपट पाहताना प्रत्येकजण आपल्या घालवलेल्या आनंदाच्या क्षणांच्या आठवणींमध्ये हरवून जातो.

इम्तियाज यांच्या करिअरबद्दल बोलायचे तर, इम्तियाजने 'नैनंद कुरुक्षेत्र' आणि 'इम्तिहान' या हिंदी मालिकांमधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्याचवेळी त्यांच्या दिग्दर्शनात बनलेला त्यांचा पहिला चित्रपट 'सोचा ना था' प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही.

इम्तियाज अलीने यांनी हार न मानता काम सुरु ठेवले आणि 'जब वी मेट' हा चित्रपट बनवला. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या अनोख्या प्रेमकथेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर तो जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटात करीनाने साकारलेली गीताची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

रोमान्सने परिपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या इम्तियाज अलीचे लव्ह लाईफही खूप मनोरंजक होते. 2002 मध्ये दिग्दर्शकाने प्रीतीशी लग्न केले. मात्र, 10 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

इम्तियाज अली आणि प्रीती यांना इदा अली ही मुलगी आहे. इदा मोठी झाली आहे आणि तिच्या ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करताना दिसत आहे.

लग्न आणि घटस्फोटानंतर इम्तियाज अली पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला. प्रीतीपासून वेगळे झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक पाकिस्तानी अभिनेत्री इमान अलीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याची बातमी जितक्या वेगाने पसरली तितक्याच वेगाने त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्याही प्रसिद्धीच्या झोतात आल्या. इम्तियाज आणि इमान 2014 मध्ये वेगळे झाले.

यानंतर 2018 मध्ये इम्तियाज अलीने शेफ सारा टॉडला डेट करायला सुरुवात केली. सारा ही रेस्टॉरंटची मालक आहे आणि तिने 'कुकबुक' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. इम्तियाजचे सारासोबतचे प्रेमही पूर्ण होऊ शकले नाही आणि दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT