Singham Again INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण नाही? त्या खास व्यक्तीच्या पोस्टनं सस्पेन्स वाढला!

Rohit Shetty Said 'Singham Is Incomplete Without this hero' : ''स्कॉर्पियो येणार.. पण एंट्री दुसऱ्या कोणाची होणार..'' रोहित शेट्टीच्या पोस्टने चाहत्यामध्ये उत्सुकता वाढली असून अजय देवगण ऐवजी अजून कोण हीरो असणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

Saam Tv

Singham Again Update : हिन्दी चित्रपटसृष्टीमधील अॅक्शन मूवीज मेकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपटाचा चाहतावर्ग मोठा आहे. सिंघमच्या सगळ्या भागांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा या वर्षीच बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

सिंघम अगेनमध्ये अजय देवगण नाही ?

रोहित शेट्टीने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'सिंघम अगेन'च्या सेटववरचा दिसत आहे. यामध्ये रोहित दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. यानंतर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारची दमदार एंट्री होताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओची फक्त झलक पाहायला मिळते. व्हिडिओ शेअर करत रोहितने कॅप्शन दिले की, ''सिंघम या हिरोशिवाय अपूर्ण आहे. या दिवाळीत स्कॉर्पियो येणार आणि फिरणारसुद्धा. पण दुसऱ्या कोणाची तरी एंट्री होईल''. रोहितच्या या कॅप्शनमुळे चित्रपटाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. त्यामुळे यावेळी अजय देवगण या चित्रपटात दिसणार नाही का? असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे. रोहितच्या व्हिडिओवर नेटिझन्सनी कमेंट केल्या आहेत. तसेच रोहित शेट्टी ज्या हिरोबद्दल बोलत आहे तो अक्षय कुमार असू शकतो असाही अनेक चाहत्यांना विश्वास आहे.

अजय देवगणचे यंदाचे 'मैदान' आणि 'औरों में कहां दम था' या चित्रपटांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. अशा परिस्थितीत आता अजयच्या चाहत्यांना 'सिंघम अगेन'कडून खूप अपेक्षा आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. मात्र रोहित शेट्टीच्या पोस्टने या चित्रपटात अजय देवगण दिसणार की नाही याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT