Marathi Actress ruchita jadhav On Rohit Arya Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actress On Rohit Arya Case: अन् मी थोडक्यात वाचले...; रोहित आर्यचा 'या' मराठी अभिनेत्रीला जाळ्यात ओढण्याचा डाव फसला

Marathi Actress On Rohit Arya Case: मुंबईतील पवई परिसरात नुकत्याच घडलेल्या होस्टेज प्रकरणानंतर आता या घटनेत एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणासाठी रोहित आर्यने एका अभिनेत्रीला संपर्क साधला आहे.

Shruti Vilas Kadam

Marathi Actress On Rohit Arya Case : मुंबईतील पवई परिसरात नुकत्याच घडलेल्या ‘होस्टेज ड्रामा’ प्रकरणानंतर आता या घटनेत एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिने स्वतः उघड केलं आहे की, आरोपी रोहित आर्यने काही दिवसांपूर्वी तिला एका चित्रपटासाठी भेटायला बोलावलं होतं आणि त्याची गोष्ट या ‘होस्टेज ड्रामा’ प्रकरणासारखी होती.

रुचिताने सांगितलं की, “मला ४ ऑक्टोबरला रोहितकडून मेसेज आला होता. त्याने सांगितलं होतं की, ‘मी एक सिनेमा बनवतोय हॉस्टेज सिच्युएशन या विषयावर. त्यासाठी तुला भेटायचं आहे.’ त्याने २७, २८ आणि २९ ऑक्टोबरपैकी एक दिवस ठरवायला सांगितलं.”

अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, तिने २८ ऑक्टोबरची वेळ दिली होती. परंतु, त्या दिवशी तिच्या सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडल्याने तीने भेट रद्द केली. त्यानंतर ३० ऑक्टोबरला पवईतील स्टुडिओतच हा भीषण होस्टेज प्रकार घडला. “त्या ठिकाणी मी जाणार होते, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. मी थोडक्यासाठी वाचले,” असं रुचिताने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Marathi Actress ruchita jadhav On Rohit Arya Case

या खुलाश्यानंतर तपास यंत्रणांमध्ये पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. कारण, रोहित आर्यने चित्रपटाच्या नावाखाली इतर कलाकारांनाही संपर्क केला होता का? याची पडताळणी केली जात आहे. त्याने आधीपासूनच हा प्लॅन आखला होता का, हेही तपासले जात आहे.

अभिनेत्री रुचिताने लोकांना सावधगिरीचा सल्लाही दिला आहे “कामासाठी कुणाशीही भेटायचं असल्यास ठिकाण, वेळ आणि व्यक्ती याबद्दल नीट माहिती घ्या. शक्य असल्यास कुटुंबीयांना कळवा. आपली सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे.” या घटनेनंतर मराठी चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रुचिताचे कौतुक करत तिला ‘सावधगिरीचा आवाज’ म्हटलं आहे, तर काहींनी फिल्म इंडस्ट्रीतील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT