Rocky Aur Rani Kii Prem Kahaani box office collection Instagram
मनोरंजन बातम्या

RRKPK Box Office Collection : बॉलिवूडची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; 'रॉकी ओर रानी की प्रेमकहानी' केला १०० कोटींचा आकडा पार

Alia Bhatt - Ranveer Singh Movie Collection : रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपटाने एकूण 180.1 कोटी कमाई केली आहे.

Pooja Dange

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Crossed 100 Crore : करण जोहर दिग्दर्शित, 'रॉकी आणि रानी की प्रेमकथा' हा चित्रपट 28 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे सुरुवात 11 कोटींनी झाली होती.

या फॅमिली ड्रामा चित्रपटाने पहिल्या वीकेंडला चांगली कमाई केली. शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन स्टारर या चित्रपट संपूर्ण आठवडाभर हिट ठरला, परंतु पहिल्या आठवड्यानंतर, 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी'ने चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'ए दिल है मुश्कील' रिलीज झाल्यानंतर सात वर्षांनी करण जोहर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे . रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर जशी कमाई करत आहे, ते पाहता करण जोहरच्या दिग्दर्शनातील कमबॅक यशस्वी ठरला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

शनिवारी सुमारे 11.5 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी सुमारे 13.82 कोटींची कमाई केली आहे. जगभरात या मल्टीस्टारर चित्रपटाने आधीच 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता.

आता भारतातही या चित्रपटाने 10 दिवसांत 100 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण कमाई 105.4 कोटी झाली आहे.

भारतात रॉकी आणि राणी की प्रेमकहानीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे, याशिवाय हा चित्रपट जगभरात चांगली कामे करत आहे. जगभरात 200 कोटींची कमाई करण्यापासून हा चित्रपट थोडाच दूर आहे.

जगभरात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपटाने एकूण 180.1 कोटी कमाई केली आहे. मात्र, तीन दिवसांनी या चित्रपटाच्या कमाईला धक्का बसू शकतो, कारण सनी देओलचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा ओ माय गॉड 2 (OMG 2) 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT