Online Fraud In The Name Of Shabana Azmi Instagram
मनोरंजन बातम्या

Shabana Azmi News: अभिनेत्री शबाना आझमींनाही ऑनलाईन फसवणुकीचा फटका, पोलिसात तक्रार

Shabana Azmi: शबाना आझमींच्या नावाचा वापर करून ऑनलाईन फसवणुक होत असल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Online Fraud In The Name Of Shabana Azmi

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमींसोबत एक धक्कादायक गोष्ट घडलीय. शबाना आझमींच्या नावाचा वापर करून ऑनलाईन फसवणुक होत असल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आलीय.

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करत चाहत्यांना सांगितले, माझ्या नावावर ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. आपल्या नावाने अनेकांची फसवणूक होत असल्याने सर्वांनी सतर्क रहावे. अशा प्रकारची सोशल मीडिया युजर्सची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये. सोबतच, मी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

याबाबत शबाना आझमी यांनी मंगळवारी ट्विटरवर पोस्ट केली. अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले की, "माझ्या नावाने काही मेसेज माझ्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबियांना पाठवले जात असल्याचे आमच्या नुकतेच लक्षात आले आहे. ही स्पष्टपणे फसवणूक आहे. कृपया सोशल मीडिया युजर्सने फ्रॉडर्सकडून आलेल्या मेसेज आणि कॉलवर क्लिक न करत त्यांना कोणतेही उत्तर देऊ नका. आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे. +66987577041 आणि +998917811675 या क्रमांकावरून असे संदेश पाठवले जात आहेत."

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयची देखील ऑनलाइन फसवणुक झाली होती. त्याची तब्बल १.५५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसात एफआयआर दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT