Roadies Season 19 Winner Instagram
मनोरंजन बातम्या

Roadies Season 19 Winner: ‘रोडिज १९’च्या ट्रॉफीवर वाशु जैनने कोरलं नाव, तर शिवेत तोमर ठरला उपविजेता

Roadies 19 Winner Vashu Jain: ‘एमटीव्ही रोडिज १९- कर्म या कांड’च्या १९ व्या सीझनचा विजेता वाशू जैन ठरलाय.

Chetan Bodke

Roadies Season 19

गेल्या काही दिवसांपासून ‘एमटीव्ही रोडिज १९’ची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. अनेकदा सोशल मीडियावर कोण स्पर्धक होणार याची चर्चाही झाली होती. अखेर ‘रोडिज १९’ ला फायनलिस्ट मिळाला आहे. टॉप ५ मधील तीन स्पर्धकांमध्ये एक विजेता ठरला. ‘एमटीव्ही रोडिज १९- कर्म या कांड’च्या १९ व्या सीझनचा विजेता वाशू जैन ठरलाय. वाशू जैन हा रिया चक्रवर्तीच्या गँगमध्ये होता. त्याच्यासोबत प्रिन्स नरुलाच्या गँगचा सिवेत तोमर उपविजेता ठरला.

यंदाच्या सीझनमध्ये प्रिन्स नरुला, रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी गँग लीडर दिसले होते. गँग लीडरप्रमाणेच त्यातल्या स्पर्धकांचीही चांगलीच चर्चा झाली होती. यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांऐवजी त्यांच्या गँग लीडरमध्येच सर्वाधिक वाद होताना दिसला.

प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझन सुद्धा तितकाच वादळी ठरला होता. ‘एमटीव्ही रोडिज १९ कर्म या कांड’च्या १९ व्या सीझनचा विजेता वाशू जैन ठरलाय. यावेळी विजेत्याला ट्रॉफी, 5 लाखांचे बक्षीस मिळाले आहेत.

या रिॲलिटी शोच्या १९व्या सीझनमध्ये वाशूने आपल्या प्रचंड ताकदीने आणि लवचिकतेने सर्वांना धक्क केलं आणि यंदाच्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

शो जिंकल्यावर वाशूने आपल्या प्रवासाबद्दल भाष्य केले, “ ‘एमटीव्ही रोडिज १९ कर्म या कांड’ हा शो जिंकणे हा घामाचा, अश्रूंचा आणि अतूट बंधांचा प्रवास होता. मी या शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यात ‘रोडिज १९ कर्म या कांड’चा मोलाचा वाटा होता. गँग लीडर रिया मॅडम आणि सोनू सरांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं. तसेच, माझ्यावर पहिल्यापासून विश्वास ठेवल्याबद्दल प्रिन्स सरांचे आभार.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT