Simran Singh found Dead at her home : आरजे सिमरन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिमरन सिंगचे निधन झाले. तिच्या मृत्यूची बातमी समजताच सोशल मिडीयावर खळबळ उडाली. २५ वर्षीय सिमरनने गुरुग्राम येथे काल राहत्या घरी फास लावून आत्महत्या केली. इंस्टाग्रामवर तिचे ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यापूर्वी ती रेडिओ जॉकी होती, तर आता ती फ्रीलान्सर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर म्हणून काम करत होती. गुरुग्राम पोलीसांनी तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. सिमरन जम्मूची रहिवासी असून इथे एका मैत्रिणीकडे राहात होती, तिनेच पोलिसांना माहिती दिली.
आरजे सिमरन गुरुग्राममध्ये राहत होती
गुरुग्राम सेक्टर ४७ मधील फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह आढळल्या नंतर पोलीसांचा तपास सुरु झाला आहे. आरजे सिमरन हे रेडिओ जगतात प्रसिद्ध नाव होते. लोक तिच्या आवाजाचे चाहते होते आणि तिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय होती.
शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
लाखो चाहते तिला आरजे सिमरन म्हणून ओळखतात अशा २५ वर्षीय सिमरन सिंगच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून असे दिसून येते की तिने शेवटची रील १३ डिसेंबर रोजी पोस्ट केली होती. तिला तिचे चाहते 'जम्मू की धडकन' म्हणून ओळखतात. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची इंस्टाग्रामवरील शेवटची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तिची शेवटची पोस्ट एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती पंजाबीमध्ये तिचे विचार शेअर करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आरजे सिमरन म्हणते, 'तू मला आवडतेस पण तू काहीच बोलत नाहीस, तुझ्या बोलण्यावर मला खूप हसू येतं, पण हे जाणून घेतल्यानंतर माझ्यावर चान्स घेण्याची गरज नाही.' सोशल मीडियावर पोस्ट खूप भावूक दिसते. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.