Pushpa 2 Stamped : तेलंगणा चेंगराचेंगरी प्रकरणाचा धसका! प्रीमियर शोवर बंदी

Pushpa 2 Stamped : पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या वादात, तेलुगू चित्रपट उद्योगाच्या प्रतिनिधींनी सीएम रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. जिथे अनेक मोठे निर्णय घेतले गेले.
Allu arjun And Revant reddy
Allu arjun And Revanth reddySaam TV
Published On

Pushpa 2 Stamped : पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान, तेलुगू चित्रपट उद्योगाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बंजारा हिल्स येथील पोलीस कमांड अँड कंट्रोल रूममध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या प्रतिनिधींमध्ये अल्लू अर्जुनचे वडील आणि निर्माते अल्लू अरविंद, अभिनेते नागार्जुन, व्यंकटेश, ज्येष्ठ अभिनेते मुरली मोहन, चित्रपट निर्माते राघवेंद्र राव, सी. कल्याण, बीव्हीएन प्रसाद, दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली, त्रिविक्रम, नवीन, हरीश शंकर, कोरटाला यांचा समावेश होता. शिवा आणि बोयापती श्रीनू यांच्या नावांचा समावेश आहे.

ही बैठक का आवश्यक होती?

उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का, सिनेमॅटोग्राफी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकट रेड्डी, गृह सचिव रवी गुप्ता, पोलिस महासंचालक जितेंद्र आणि इतर अधिकारीही या बैठकीमध्ये उपस्थित होते. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरली. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Allu arjun And Revant reddy
Amitabh Bachchan : 'मी जयाजींकडून मागतो पैसे...'; कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा

सरकार आणि उद्योग यांच्यामधील दुवा

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक चित्रपट विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असल्याचे दिल राजू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. दिल राजू म्हणाले, "आम्ही सर्वांशी संवाद साधला आहे, जे शहरात आहेत ते मीटिंगमध्ये सहभागी होतील. चित्रपट उद्योगाशी संबंधित समस्यांवर बैठकीत चर्चा केली जाईल." फिल्म इंडस्ट्री आणि सरकार यांच्यातील दुवा म्ह्णून काम करणार असल्याचे दिल राजूने सांगितले होते.

यादरम्यान सीएम रेवंत रेड्डी म्हणाले, 'चित्रपट उद्योगाने काही मुद्दे आणि कल्पना सरकारसमोर मांडल्या आहेत. सरकारने यापूर्वीच 8 चित्रपटांबाबत आदेश दिले आहेत. तेलगू फिल्म इंडस्ट्रीची जागतिक ओळख व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे.

Allu arjun And Revant reddy
Baby John : सलमान खान ॲटलीच्या चित्रपटात कॅमिओ पुरताच की प्रेक्षकांना मिळणार आणखी मोठं सरप्राईज !

कायद्याशी तडजोड केली जाणार नाही

माहितीनुसार, या बैठकीत सरकारने प्रीमियर शो आणि चित्रपटांच्या स्पेशल स्क्रीनिंगवरही बंदी घातली आहे. याचा अर्थ आता तेलंगणात चित्रपटांच्या विशेष प्रदर्शनावर बंदी घालण्यात येणार आहे. अल्लू अर्जुनसारख्या हाय-प्रोफाइल अभिनेत्याच्या खासगी सुरक्षा रक्षकांनाही सरकारने इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत कायद्याशी तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com