Ved Marathi Movie Poster Instagram/ @riteishd
मनोरंजन बातम्या

Ved Box Office Collection: 'वेड' चित्रपटाची 'सैराट' कामगिरी; एका दिवसातच केला कोटींचा गल्ला...

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडोंची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

Chetan Bodke

Ved Box Office Collection: रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा 'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना खरंच वेड लावले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडोंची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत. रितेश- जिनिलीयाच्या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर रितेश जिनिलीयाच्या चित्रपटातील गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नुकताच चित्रपटाने ३० कोटींचा टप्पा गाठला असल्याची पोस्ट रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

चित्रपटाने इतक्या कोटींचा पल्ला फक्त विकेंडलाच कमवला नसून इतरही दिवस चांगलीच कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून अद्यापही त्याचे सोशल मीडियावर प्रमोशन थांबलेले नाही. 'मला वेड लागलंय'या गाण्याने चाहत्यांना थिरकायला भाग पाडलं आहे. मनमुराद नाचणाऱ्या प्रेक्षकांनी आठवड्याच्या शेवटी चित्रपटगृहात नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एका दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5.70 करोडची कमाई केली आहे. एका दिवसाच्या या कमाईनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रितेश शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, 'प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार. वेड चित्रपटाला आपलं प्रेम आणि आशिर्वाद असाच लाभू द्या. 10 व्या दिवशी मराठी सिनेमानं आतापर्यंतचा सर्वाधिक एक दिवसाचं कलेक्शन केलं आहे. हे स्वप्नासारखे वाटतं, वेड वर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो' या चित्रपटाने रविवारी ८ जानेवारी रोजी एका दिवसातच ५. ७० कोटींचा गल्ला जमवला आहे.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये गल्ला जमावला. रविवारी ४ कोटी ५० लाख तर सोमवारी ३ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. चित्रपटाची गेल्या आठवड्यातील कमाई पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चित्रपटाला जर प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद दिला तर हे आकडे येत्या काळात आणखी वाढतील अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

आठवड्याभरात या चित्रपटाने तब्बल आतापर्यंत ३० कोटींचा पल्ला गाठला असून मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटासमोर अनेक बॉलिवूड चित्रपटांची जादू मात्र फिकी पडली. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार, याकडे सर्वाचंच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Khatal : नाकर्तेपणामुळे लोकांनी थोरातांना घरी बसवल्याने ते वैफल्यग्रस्त; आमदार अमोल खताळ यांची बाळासाहेब थोरातांवर टिका

Maharashtra Live News Update : - खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला

Moringa Ladoo: ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खा मोरिंगाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत; शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? पाहा VIDEO

Maa OTT Release: थिएटरनंतर काजोलचा 'माँ' ओटीटीवर होणार प्रदर्शित; हा हॉरर चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT