Plan A Plan B या चित्रपटातून रितेश देशमुख पहिल्यांदाच Netflix वर झळकणार Instagram/@netflix_in
मनोरंजन बातम्या

Plan A Plan B या चित्रपटातून रितेश देशमुख पहिल्यांदाच Netflix वर झळकणार

Plan A Plan B या त्याच्या आगामी रोमँटीक चित्रपटातून तो लोकप्रिय डिजीटल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर तो झळकणार आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मराठमोळा बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुख (ritesh deshmukh) हा पहिल्यांदाच ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. प्लॅन ए प्लॅन बी (Plan A Plan B Movie) या त्याच्या आगामी रोमँटीक चित्रपटातून तो लोकप्रिय डिजीटल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) तो झळकणार आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट शेयर करत त्याने ही माहिती दिली आहे. त्यामुळे रितेशच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट असणार आहे. (Riteish Deshmukh will be seen on Netflix for the first time in the movie Plan A Plan B.)

हे देखील पहा -

''डिजीटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर एंट्री करत असून यासाठी अतिशय उत्साही आहे'' अशी भावना रितेशने व्यक्त केली आहे. अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत (Tamanna Bhatia) तो नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांका घोष करणार आहेत. कोरोना काळात लॉकडाऊन लावण्यात आले होते. याचा सर्वात मोठा फटका सिनेसृष्टीला बसला होता. कोरोना निर्बंधामुळे थिएटर्स आणि नाट्यगृहे बंद करण्यात आली होती. सध्याच्या घडीला देखील ती बंदच आहेय त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांचा कल ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे झुकला आहे.

लॉकडाऊनमुळे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, डिस्नी हॉटस्टार, सोनी लिव्ह, एम एक्स प्लेयर, वुट, झी फाईव्ह अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाण कैक पटींनी वाढले आहे. त्यामुळे रितेशही आता नेटफ्लिक्सवर एंट्री करत असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT