मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी टास्क फोर्सला Task Force पत्र Letter लिहलं आहे. या पत्रामध्ये संदीप देशपांडे म्हणाले की, सर्वप्रथम आपण एवढ्या व्यस्थ कार्यक्रमामध्येसुध्दा वेळ देऊन उपकृत केलंत त्याबद्दल आपले मनापासून आभार . गेल्या पंधरा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र हा टाळेबंदीमध्ये अडकला आहे . अर्थात काही दिवसांचा अपवाद वगळता . टाळेबंदीचा निर्णय किंव्हा निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा आपल्या सल्ल्यानुसार घेतला जातो असे वारंवार सांगितले जाते म्हणूनच हा पत्र प्रपंच , आपल्या किंव्हा टास्कफोर्स मधील असलेल्या आपल्या कुठल्याही सहकाऱ्यांच्या क्षमते विषयी माझ्या मनात शंका नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो . परंतु मला प्रामाणिकपणे अस वाटत की टास्क फोर्स मध्ये अजून काही व्यापक मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे . आपल्यासारखी तज्ञ डॉक्टर मंडळी तर आहेतच पण त्याबरोबर काही अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक , data analysts , शिक्षणतज्ञ अश्या लोकांचा समावेश करण आवश्यक आहे.
पुढे ते म्हणाले की, याच कारण अस की सध्या फक्त करोना रोग , त्याचे उपचार व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम फक्त यावरच विचार होताना दिसतोय. पण या सगळ्याचा रोजच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जात नाही आहे असे माझे निरीक्षण आहे . आज लाखों लोकांचा रोजगार गेला आहे . अनेकांचे उद्योगधंदे बुडालेले आहेत , लोकांचे बँकांचे हफ्ते थकलेले आहेत , अर्थ चक्र ठप्प झालेलं आहे . यावर उपाय काय याचीही चर्चा आवश्यक आहे . असे अनेक मुद्दे समोर आले की , जीव महत्वाचा जीव वाचला तर सर्व काही हा युक्तिवाद पुढे केला जातो .
हे देखील पहा -
अगदी मान्य जीव महत्वाचाच आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही पण या युक्तिवादाचा आधार घेऊन आपण काही गोष्टींचा अतिरेक करतो आहोत का ? आज रेल्वे प्रवास किंव्हा रस्ते प्रवास किंव्हा विमान प्रवास करत असताना अपघात होतात काही मृत्यू ही होतात म्हणून आपण प्रवास करणे थांबवतो का ? तर त्याच उत्तर नाही असे आहे. उलट आपण यातले धोके ओळखून अपघात कसा टाळता येऊ शकेल याचा विचार करून प्रवास चालु ठेवतो . बंद करत नाही . दुसरं एक उदाहरण बघूया तंबाखुजन्य पदार्थ किंव्हा मद्यपान या शरीरास हानिकारक गोष्टी आहेत . हे सर्व श्रुत आहे म्हणून सरकारने त्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत का ? तर नाही. कारण त्यातून सरकारला मिळणार महसूल प्रचंड आहे. त्यामुळे सरकारने मध्य मार्ग काढत या दोन्ही गोष्टींवर अनेक निर्बंध लादले आहेत. कर वाढवले आहेत. पण या गोष्टी पूर्णपणे बंद केलेल्या नाहीत असे देखील यावेळी संदीप यांनी आपल्या पत्रात लिहलं आहे.
याच प्रमाणे आपल्याला हा विचार करणे आवश्यक आहे की आपल्य संख्येला नाही तर त्यामुळे होण्याऱ्या मृत्यूला घाबरल पाहिजे . कायमची किंव्हा सततची टाळेबंदी हा त्यावर उपाय असू शकत नाही हे हळूहळू दबक्या आवाजात जग मान्य करायला लागल आहे . टाळेबंदीचा उपयोग हा रोगप्रसार थांबवण्यासाठी नाही तर व्यवस्था उभी करण्यासाठी केला पाहिजे असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे . एकदा ही गोष्ट आपण मान्य केली की आपल्या विचारला नवीन दिशा मिळू शकेल . आपण जर ठरवलं की आपल्याला करोनाचा धोका कमी करून सर्व चालू करायचं आहे तर आपल्याला अनेक मार्ग मिळू शकतात . पण त्यासाठी विचारामध्ये सकरत्मकता आणावी लागेल . उदाहरणार्थ समजा आपल्याला शाळा चालू करायच्या आहेत एखाद्या वर्गात पन्नास मुले आहेत तर त्याचे दोन भाग करून आठवड्यातून दोन दोन दिवस त्यांना शाळेत प्रवेश देता येईल का ? असा विचार होऊ शकतो का ? म्हणजे प्रत्येकाला किमान दोन ते तीन दिवस शाळेत जाता येईल असे देखील ते म्हणाले.
मी काही यातला तज्ञ नाही आणि कोणी डॉक्टरसुद्धा यातले तज्ञ नाहीत . हा विषय व्यवस्थापनाचा ( management ) चा आहे . म्हणूनच या टास्क फोर्स मध्ये सर्व प्रकारची तज्ञ मंडळी असली पाहिजेत असा माझा आग्रह आहे . कुठे रुग्ण संख्या वाढतेय , कशामुळे वाढतेय , इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी data analyst पाहिजेत . ज्याला आपण म्हणतो की out of the box असा विचार करण्यासाठी शास्त्रज्ञ पाहिजेत . आज जी मत आपल्यासमोर मांडली आहेत ती अनेक मत अनेक लोकांनी माझ्याशी चर्चा करताना मांडली आहेत . ती सर्व एकत्रित करून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे . सध्या डेल्टा प्लस तिसरी लाट याची जोरदार चर्चा चालू आहे . म्हणूनच लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याबद्दल क्षमस्व . पण आता पुन्हा टाळेबंदी लोकांच्या सहनशक्तीचा अंत करणारी ठरेल म्हणून हे धाडस केले . आपण या सर्व मुद्द्यांचा सर्व दृष्टिकोनातून निश्चित विचार कराल असा ठाम विश्वास आहे असे देखील संदीप देशपांडे यांनी आपल्या पात्रात यांनी नमुद केलं आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.