Siddharth Shinde Riteish Deshmukh x
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या मित्राचे निधन, फोटो शेअर करताना अभिनेता झाला भावुक

Siddharth Shinde Riteish Deshmukh : सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन झाले. ते अभिनेता रितेश देशमुखचे खास मित्र होते. मित्राच्या मृत्यूमुळे रितेशला मोठा धक्का बसला आहे.

Yash Shirke

  • रितेश देशमुखच्या मित्र सिद्धार्थ शिंदे यांचे निधन.

  • रितेश भावुक पोस्टद्वारे आठवणी शेअर केल्या.

  • सिद्धार्थ शिंदे यांच्या कुटुंबाला सहानुभूती व्यक्त केली.

Riteish Deshmukh Post : सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे १५ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी न्यायालयात त्यांना अचानक भोवळ आली. त्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काल (१६ सप्टेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिद्धार्थ शिंदे हे वकिलीच्या पेशात असले तरीही राजकीय क्षेत्राशी त्यांचे संबंध होते. ते माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. सिद्धार्थ शिंदे आणि अभिनेता रितेश देशमुख हे खास मित्र होते. दोघांमध्ये घट्ट असे मैत्रीपूर्ण संबंध होते. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाच्या बातमीने रितेशला धक्का बसला. त्याने सिद्धार्थ यांच्यासोबतचे फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली. रितेश देशमुखच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटात सिद्धार्थ यांनी काम केले आहे. चित्रीकरणादरम्यानचे फोटो देखील रितेशने पोस्ट केले आहेत.

रितेशने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'ही पोस्ट शेअर करताना माझं मन भरुन आलं आहे. सिद्धार्थ शिंदे माझा वर्गमित्र आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होता. तो खूप दयाळू, नम्र, नेहमीच अढळ पाठिंबा देणारा होता. सहा वर्षांपूर्वी जेव्हा त्याने ऐकले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत आहे तेव्हा त्याने मला फोन केला होता. रितेश मला या सिनेमाचा भाग होऊ दे, काही सेकंदांसाठी काही होईना मला सिनेमात काम करायचे आहे असे म्हटले होते.'

'आज, त्यांचे सीन एडिट करताना त्यांची प्रतिभा पुन्हा पाहून हसत होतो आणि लगेच त्यांच्यासोबत हा आनंद शेअर करावा अशी इच्छा झाली. पण नंतर धक्कादायक बातमी मिळाली – तो आता आपल्यात नाहीत. सिद्धार्थ, माझ्या मित्रा, तू एक दुर्मिळ रत्न होतास. तुझ्या कुटुंबाला आणि प्रियजनांना माझी मनापासून सहानुभूती. शांती लाभो, प्रिय मित्रा - तू आमच्या मनात कायमचा जिवंत राहशील', असे म्हणत रितेश देशमुखने मनातील भावना व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT