Riteish Deshmukh saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांवर रितेश देशमुख संतापला, म्हणाला - "खपवून घेणार नाही..."

Riteish Deshmukh - Raja Shivaji : रितेश देशमुख आणि जिनिलियाने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) ला भेट दिली आणि शिवरायांचे दर्शन घेतले. तसेच रितेशने शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना चांगलेच खडसावले.

Shreya Maskar

साम प्रतिनिधी - फैय्याज शेख, भिवंडी

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज होणार आहे.

नुकतेच रितेश देशमुख आणि जिनिलियाने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ)ला भेट दिली.

रितेश देशमुखने शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना चांगलेच फटकारले.

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी लवकरच 'राजा शिवाजी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटानिमित्त रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखने भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) येथे जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले. ढोल ताशांच्या गजरात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या या क्युट जोडीने एकत्र मिळून महाआरती देखील केली. रितेश आणि जिनिलिया शनिवारी सायंकाळी शिवरायांच्या दर्शनासाठी पोहचले. याचे फोटो आणि व्हिडीओ 'राजश्री मराठी'ने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

महाराजांच्या दर्शनानंतर रितेश देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठाची महती मी बरीच ऐकली होती, त्यामुळे मी आज या ठिकाणी येऊन दर्शन घेतले आहे. हे भव्यदिव्य मंदिर आणि या परिसरातील कलाकृती मधून महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्वांसमोर मांडला आहे. महाराजांवरच्या श्रद्धेपोटी, प्रेमापोटी एवढे भव्य मंदिर उभारले या बद्दल शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंद..."

शेवटी आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र महाराज बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल विचारले असता, "मी काही ऐकलेले नाही, मला ते विषय माहीत नाहीत, असे बोलत रितेश देशमुख यांनी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही असे स्पष्ट केले..."

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT