World Earth Day 2026 : 22 एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून का साजरा करतात? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Manasvi Choudhary

जागतिक पृथ्वी दिन

दरवर्षी संपूर्ण जगभरात २२ एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो.

World Earth Day 2026

पर्यावरणाचे संरक्षण राखणे

पर्यावरणाचे संरक्षण राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

World Earth Day 2026

महत्व

वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि जंगलतोड या समस्याने पर्यावरणाची हानी होत आहे. यासाठी वेळेवर उपाययोजना केली नाही तर पुढच्या पिढ्यांनी याचा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

World Earth Day 2026

कधीपासून झाली सुरूवात

१९७० मध्ये पहिल्यांदा अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी जागतिक पृथ्वी दिनाची सुरूवात केली. अमेरिकेत पर्यावरणाचे प्रदूषण झपाट्याने वाढत असल्याने त्यांनी नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी सुरूवात केली.

World Earth Day 2026

नागरिकांचा सहभाग

त्यांनतर २२ एप्रिल १९७० रोजी लाखो नागरिकांनी या उपक्रमाला सहभाग दाखवला आणि जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्यात आला.

World Earth Day 2026

उपक्रमात तरूणाईचा सहभाग

या उपक्रमाने पर्यावरणाच्या संरक्षणाला नवीन दिशा मिळाली. त्यांनतर संपूर्ण जगभरात याची सुरूवात झाली. या उपक्रमात जास्तीत जास्त तरूणाई सहभागी व्हावी. अमेरिकेतली विद्यार्थी, सर्वसामान्यांसाठी २२ एप्रिल हा दिवस शक्य होता म्हणून हा दिवस निवडण्यात आला.

World Earth Day 2026

यंदाची थीम काय

यावर्षीची थीम ही प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा देऊन पृथ्वीला प्लास्टिकमुक्त करण्यावर आहे

World Earth Day 2026

next: Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Hair Problem
येथे क्लिक करा...