Manasvi Choudhary
उन्हाळ्यात केस गळतीच्या समस्येने अनेक महिला व पुरूष त्रस्त आहेत. केसांच्या समस्यांवर बाजारातील महागड्या उत्पादनापेक्षा तुम्ही घरगुती सोपे उपाय करू शकता.
कांदा रस केसांसाठी कांद्याचा रस अत्यंत फायदेशीर आहे. कांद्याच्या रस केसांना लावल्याने केसांचा वाढ चांगली होते.
रात्री पाण्यात मेथी दाणे भिजवून सकाळी याची पेस्ट करून केसांना लावल्याने केसांना फायदा होतो केस गळती थांबते.
रात्री झोपताना केस मोकळे सोडू नका यामुळे केसांत गुंता होतो आणि केस कमजोर होतात.
केसांच्या मुळांना तेल लावताना थेट हाताने लावू नका. कापसाच्या बोळाच्या साहाय्याने केसांना तेल लावा.
केस धुण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता यामुळे केस सिल्की आणि सरळ होण्यास मदत होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.