Riteish Genelia Deshmukh Kids Saam Tv
मनोरंजन बातम्या

22 उंदीरमामा, २ मोदक आणि आपले गणपती...; रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांनी साकारला रोबोटिक्स गणेशा, पाहा VIDEO

Riteish Genelia Deshmukh Kids: रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांच्या घरी यंदाचा गणेशोत्सव खूपच आगळावेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे. या कपलच्या मुलांमुळे यावर्षी ‘रोबोटिक्स गणपती’ तयार केला आहे.

Shruti Vilas Kadam

Riteish Genelia Deshmukh Kids: रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांच्या घरी यंदाचा गणेशोत्सव खूपच आगळावेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे. नेहमीच आपली गोड मैत्री, कौटुंबिक प्रेम आणि रिल्समुळे चर्चेत राहणारे हे कपल सध्या त्यांच्या मुलांमुळे चर्चेत आहेत. रियान आणि राहिल या दोघांनी मिळून तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रोबोटिक्स गणपती’ तयार केला आहे. त्यांच्या या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तो तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांच्या नजरा थेट या छोट्या कलाकारांवर खिळल्या.

या रोबोटिक्स गणपतीची रचना केवळ मूर्तीपुरती मर्यादित नसून त्यात "उंदीर मामा" आणि "मोदक" यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच पारंपरिक गणपतीच्या स्वरूपाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लहानग्यांनी सणाला एक नवीन वळण दिलं आहे. ही कल्पना लोकांना तितकीच गोड आणि आश्चर्यचकित करणारी वाटली आहे.

रितेशने हा व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या मुलांच्या क्रिएटिव्हिटीबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त केला. त्याने लिहिलं की, "माझ्या मुलांनी स्वतःच्या कल्पनेतून आणि मेहनतीतून हा गणराया तयार केला आहे. तंत्रज्ञानाची समज, कल्पनाशक्ती आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम त्यांनी घडवून आणला आहे." जिनिलियानेदेखील मुलांचे कौतुक करत, "ही फक्त मूर्ती नाही तर त्यांच्या मनातील श्रद्धा, आवड आणि तंत्रज्ञानाकडे असलेला कल, खेळावरील प्रेम दाखवणारा एक छोटा चमत्कार आहे," असं म्हटलं.

सोशल मीडियावर चाहत्यांनी या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी लिहिलं की, “हा भविष्यातील भारताचा चेहरा आहे. एका नेटकऱ्याने लिहीले, आपल्या संस्कृती आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व शिकणारी ही पिढी खरोखरच प्रेरणादायी आहे.” तर काहींनी रितेश-जिनिलियाच्या मुलांना “लहान शास्त्रज्ञ” म्हणत शुभेच्छा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: गुरुवार ठरणार चार राशींसाठी गेम-चेंजर! गुरुवारच्या पंचांगातून जाणून घ्या कोण होणार लकी

Lapsi Recipe: मऊ लुसलुशीत गुळाची लापशी कशी बनवायची?

SIP Calculator: २० वर्षांसाठी १०,००० रुपयांची SIP करा, अन् महिन्याला ६५,००० मिळवा; सोप्या शब्दात कॅल्क्युलेशन समजून घ्या

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

SCROLL FOR NEXT