Rinku Rajguru Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru: प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी, मनात अभिमान...; रिंकू राजगुरूच्या 'आशा' चित्रपटाची भावस्पर्शी सुरुवात

Rinku Rajguru Movie: मुंबईत जागतिक कन्या दिनानिमित्त मराठी चित्रपट ‘आशा’ची विशेष स्क्रीनिंग पार पडली. या चित्रपटात रिंकू राजगुरूने या चित्रपटात एका ‘आशा सेविके’ची भूमिका साकारली आहे.

Shruti Vilas Kadam

Rinku Rajguru Movie Asha: मुंबईत जागतिक कन्या दिनानिमित्त मराठी चित्रपट ‘आशा’ची विशेष स्क्रीनिंग पार पडली. आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे झालेल्या या सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या दमदार आणि हृदयाला भिडणाऱ्या भूमिकेचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केलं.

रिंकू राजगुरूने या चित्रपटात एका ‘आशा सेविके’ची भूमिका साकारली आहे. समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या, स्वतःच्या अडचणींवर मात करून इतरांच्या आरोग्यासाठी लढणाऱ्या स्त्रीचं पात्र रिंकू राजगुरूने उत्तमप्रकारे साकारलं आहे. ‘सैराट’नंतर रिंकूने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास, संवादातील ठामपणा आणि भावनिक प्रसंगातील नैसर्गिकता यामुळे तिची ही भूमिका तिच्या कारकिर्दीतली एक महत्वाची ठरली आहे.

या विशेष स्क्रीनिंगला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आणि शायना एन.सी. उपस्थित होते. सुमारे ५०० आशा आणि अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला हजर होत्या. चित्रपट पाहताना अनेक सेविकांच्या डोळ्यांत अश्रू आले, कारण पडद्यावर त्यांनी स्वतःचं आयुष्य उमटताना पाहिलं.

या निमित्ताने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “चित्रपट हे समाजप्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे. ‘आशा’ हा सिनेमा महिलांच्या निःस्वार्थ सेवाभावाला आणि त्यांच्या लढ्याला योग्य न्याय देतो. दिग्दर्शक व निर्मात्यांचे हे संवेदनशील प्रयत्न मनापासून कौतुकास्पद आहेत.” तसेच या प्रसंगी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यात आला.

‘आशा’ने आधीच ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या चार प्रमुख विभागांत पुरस्कार पटकावले आहेत. 'आशा' चित्रपटात रिंकूसोबत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते आणि दिलीप घारे यांच्या भूमिका आहेत. सिनेमॅटोग्राफी सुप्रसिद्ध छायाचित्रकार सुरेश सारंगम यांची आहे.रिंकू राजगुरूच्या या हृदयस्पर्शी भूमिकेमुळे मराठी सिनेमात पुन्हा एकदा स्त्रीशक्तीचा आवाज घुमला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

SCROLL FOR NEXT