Miss Universe India 2024 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Miss Universe India 2024 : गुजरातच्या सुंदरीच्या डोक्यावर सजला 'मिस युनिव्हर्स' चा मुकूट, कोण आहे रिया सिंघ?

Rhea Singha : रियाने 'मिस युनिव्हर्स इंडिया' चा किताब जिंकला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा (Miss Universe India 2024 ) किताब गुजरातच्या (Gujarat ) रिया सिंघाने पटकवला आहे. स्वतः उर्वशी रौतेलाने आपल्या हाताने तिला हा मुकुट घातला आहे. एकूण 51 स्पर्धकांमधून रियाने हे यश संपादन केले आहे. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले रविवारी राजस्थानमधील जयपूर येथे पार पडला. तिच्या या विजयाने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. भारतासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.

रियाने (Rhea Singha) आपल्या यशानंतर मन मोकळ केलं. ती म्हणाली, "आज किताब जिंकल्यानंतर मी खूप खुश आहे. तसेच तुमच्या सर्वांची आभारी देखील आहे. मी या स्तरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला माजी विजेत्यांकडून देखील खूप प्रेरणा मिळाली आहे."

10 वर्षांपूर्वी हा मान बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela) मिळाला होता. तिने 2015 रोजी मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा जिंकली होती. रियाला तिने मुकूट घातला. तसेच

या दरम्यान उर्वशी रौतेला म्हणाली की, "मला याची खात्री आहे की, यंदा मिस युनिव्हर्सचा ताज भारत पुन्हा जिंकेल. सर्व मुली मेहनती आणि सुंदर आहेत." या विजयानंतर आता रिया सिंघा 'इंटरनॅशनल मिस युनिव्हर्स 2024' या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 'मिस युनिव्हर्स इंडिया' स्पर्धेचा दुसरा क्रमांक प्रांजल प्रियाने पटकवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

SCROLL FOR NEXT