Rhea Chakraborty Controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rhea Chakraborty: 'नही जाना जेल फिरसे...'; रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर व्यक्त केल्या भावना

Rhea Chakraborty Controversy: 'एमटीव्ही रोडीज एक्सएक्स' च्या एका भागात रिया चक्रवर्तीने पुन्हा तुरुंगात जाऊ इच्छित नसल्याबद्दल टिप्पणी केली. २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तिला तुरुंगवास भोगावा लागला होता.

Shruti Vilas Kadam

Rhea Chakraborty: 'एमटीव्ही रोडीज एक्सएक्स' च्या एका भागात रिया चक्रवर्तीने अलीकडेच तिच्या भूतकाळातील तुरुंगवासाबद्दल एक हलकेफुलका विनोद केले. एका टास्कचा भाग म्हणून, प्रत्येक टिमचे कॅप्टन पिंजऱ्यात बंद होते आणि त्यांच्या टीमचे सदस्य त्यांना सोडण्याचा प्रयत्न करत होते. या शोमध्ये रिया, एका टोळीची प्रमुख आहे, ती तिच्या टिमला मदत करत होती. तसेच, या टास्क दरम्यान रिया तिच्या टिमला मार्गदर्शन करत हसून म्हणाली की तिला पुन्हा तुरुंगात जायचे नाही.

टास्क दरम्यान तुरुंगात जाण्याबद्दल रियाची प्रतिक्रिया

जेव्हा रणविजय सिंह यांनी जाहीर केले की टोळीच्या नेत्यांना टास्कसाठी पिंजऱ्यात बंद केले जाईल, तेव्हा रियाने विनोदाने म्हटले, "मुझे नहीं जाना फिरसे जेल." तिच्या या टिप्पणीचा संदर्भ तिच्या भूतकाळातील तुरुंगवासाबद्दल होता. त्यानंतर प्रिन्स नरुलाने एल्विश यादवच्या कायदेशीर अडचणींबद्दल एक गंमतीशीर भाष्य केले म्हणाला, एल्विशची आतअसताना हेच दुःख होत.

एसएसआर प्रकरणात रियाला क्लीन चिट

२०२० मध्ये, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अचानक निधनामुळे मीडियामध्ये तीव्र कव्हरेज आणि अनेक तपास सुरू झाले. सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या रिया चक्रवर्तीला कडक तपासणीचा सामना करावा लागला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्जशी संबंधित प्रकरणात तिला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली. ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. त्यापूर्वी रिया जवळजवळ एक महिना तुरुंगात होती. तथापि, सुशांतच्या दुःखद मृत्यूमध्ये तिचा कोणत्याही सहभाग नसल्याचे निश्चित झाले आहे. फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम रिपोर्टसह अधिकृत तपासात असा निष्कर्ष काढला गेला की अभिनेत्याचा मृत्यू आत्महत्याने झाला, या प्रकरणाचे वर्णन "आत्महत्येचे स्पष्ट प्रकरण" असे केले. त्यामुळे रियाला या प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे.

रियाला पाठिंबा

रियाला क्लीन चिट दिल्यानंतर, अनेक सेलिब्रिटी तिच्या समर्थनात आले; अभिनेत्री सोनी राजदानने तिच्यासाठी चिंता व्यक्त केली आणि "आधुनिक काळातील जादूटोणा" असे म्हटले. अभिनेत्री दिया मिर्झानेही माध्यमांकडून जबाबदारीची मागणी केली. तिने इंस्टाग्रामवर लिहिले, "रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाची लेखी माफी मागण्याची कृपा मीडियामध्ये कोण करेल?"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT