Expensive Return Gifts For Guests At Radhika-Anant's Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Radhika-Anant's Wedding Return Gifts : बापरे... अनंत-राधिकाच्या लग्नात कोट्यवधींच रिटर्न गिफ्ट, सेलिब्रिटींना मिळालं २ कोटींचं घड्याळ

Expensive Return Gifts For Guests At Radhika-Anant's Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला. लग्नामध्ये अनंत अंबानी यांनी खास २५ पाहुण्यांसाठी कोट्यवधींचं लक्झरी वॉच रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं आहे.

Apurva Kulkarni

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला.. या लग्नसोहळ्यासाठी अनेक VVIP पाहुण्यानी उपस्थिती लावली होती. करोडो रुपये खर्च करून विवाहसोहळ्यात वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन करण्यात आलं होतं..

लग्नात राधिका मर्चंट हिने सोन्याच्या धाग्यापासून बनवलेल्या लेहंगा घातला होता. तर अनंत अंबानीच्या कपड्याची किंमत २१४ कोटी इतकी होती. मोठ्या थाटमाटात अनंत-राधिकाचा विवाह सोहळा संपन्न झाला.. खाण्यापासून ते डेकोरेशनपर्यंत प्रत्येक सोशल मीडियावर प्लॅटफॉमवर अंबानींच्या लग्नाची हवा पहायला मिळाली. आता त्यात सध्या चर्चा सुरू आहे ती अंबानी यांनी लग्नात दिलेल्या रिटर्न गिफ्टची. अंबानी यांनी खास 25 पाहुण्यांसाठी कोट्यवधींचं लक्झरी वॉच रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं आहे.

१२ जुलै रोजी जियो वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत आणि राधिकाचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नात नव वधु-वरासह पाहुण्यांनी धमाल केली. दरम्यान, लग्नातील खास पाहुण्यासाठी अंबानी कुटुंबियांनी लक्झरी वॉच रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, रणवीर सिंह, मिजान जाफरी यांच्यासह २५ जवळच्या पाहुण्यांना तब्बल दोन कोटींचं लक्झरी वॉच गिफ्ट म्हणून दिलेलं आहे.

या पाहुण्यांना दिलेलं लक्झरी वॉच हे ऑडेमार्स पिग्यूट ब्राण्डचं आहे. लिमिटेड एडिशनमध्ये बनवलं हे घड्याळ १८ कैरेट गोल्डमध्ये तयार केलं गेलं आहे. या घड्याळाची किंमत २ लाख डॉलर म्हणजेच १.६७ कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान लग्नसोहळ्यात घड्याळ घातलेल्या पाहुण्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

घड्याळात नक्की काय खास आहे?

गिफ्टमध्ये दिलेल्या या घड्याळाला सोन्याचा मुलामा आहे. तसंच या घड्याळ्याला 18 कॅरेट गोल्ड केस लावण्यात आलं आहे. घड्याळ्यावर सफायर क्रिस्टलचं डार्क ब्लू डायल ही लावण्यात आलं आहे. घड्याळात एक गुलाबी सोन्याची अवाजाची इंटरनल बेल देखील बसवण्यात आली आहे. तसंच हे घड्याळ वॉटरप्रुफ आहे. या घड्याळात दिवस, तारखेसह खगोलीय चंद्रमा, महीना, लीप वर्ष दिसतं. तास आणि मिनिटांचं एक कॅलेंडरही घड्याळ्यात ॲड करण्यात आलं आहे.

अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यात या खास २५ पाहुण्यांनी घड्याळासह मॅचिंग आउटफिट घालून जबरदस्त डान्स केलेला आहे. सध्या सोशल मीडियावर या घड्याळाची जोरदार चर्चा होताना दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT