प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा (Remo D'souza) यांचा मेहुणा जेसन वॅटकिन्स याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. गुरुवारी जेसनने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून लिजेल डिसूजाला (Lizelle D'souza) मोठा धक्का बसला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील (Mumbai) कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी बहिण लिजेलने या प्रकरणी तिच्या भावाने हे पाऊल का उचलले याबाबद माहिती दिली आहे. Remo (D'souza brother in law death)
हे देखील पहा -
एक वृत्ताशी बोलताना लिजेलने सांगितले की त्यांचे वडील किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत, ते डायलिसिसवर होते आणि आपल्या मुलाला रुग्णालयातून शोधत ते घरी परतले तेव्हा त्यांना मुलगा या अवस्थेत सापडला. लिजेलने पुढे सांगितले की, कसेतरी घरी पोहोचल्यानंतर वडिलांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना जेसन आत्महत्या केल्याचे दिसून आले. मुंबईत आईच्या निधनानंतर तिचे वडील आणि भाऊ दोघेही एकत्र राहत होते.
जेसन नाराज होता का? या प्रश्नाला उत्तर देताना रेमो डिसूजाची पत्नी लिझेलने रडत रडत प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, आईच्या मृत्यूनंतर तो खूप निराश झाला होता. 2018 मध्ये जेव्हा आईचे निधन झाले तेव्हा तो खूप तुटला होता, कारण तो तिच्या सर्वात जवळ होता. जेसन वॅटकिन्सच्या निधनाचे वृत्त ऐकून रेमो डिसूजा आणि त्याच्या पत्नीला धक्का बसला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.