
पश्चिम आफ्रिकेतील घाना (Ghana Explosion) या देशात झालेल्या भीषण स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59 जण जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, खाणकामात वापरलेली स्फोटके नेणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली आणि त्याचा स्फोट झाला, त्यात किमान 17 जण ठार झाले आणि 59 जण जखमी झाले. (Ghana Explosion Latest News)
गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये स्फोटाचा परिसर दिसत आहे. ज्यामध्ये डझनभर इमारती कोसळल्या आहेत. एका निवेदनात, पोलिसांनी म्हटले आहे की "प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की खाणकामात वापरलेली स्फोटके घेऊन जाणारे वाहन एका दुचाकीचीला धडकले, ज्यामुळे स्फोट झाला." पूर्वीप्रमाणे परिस्थिती सामान्य होईपर्यंत लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी अपघातस्थळावरून इतर शहरात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
500 इमारतींचे नुकसान
नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन (NADMO) चे उपमहासंचालक सेजी साजी अमेदोनु यांनी सांगितले की, या भीषण अपघातात 500 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. एका प्रादेशिक आपत्कालीन अधिकाऱ्याने स्थानिक मीडियाला सांगितले की त्यांनी 10 मृतदेह पाहिले आहेत. पोलिसांनी सांगितले की, जवळपासच्या शहरांना शाळा आणि चर्चचे दरवाजे उघडण्यास सांगितले आहे. जेणेकरून स्फोटामुळे बाधित झालेल्या लोकांना तिथे आश्रय घेता येईल. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित होते.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.