फॅन्ड्री फेम शालू 'रेडलाईट'मध्ये... पहा ट्रेलर Instagram/@rajeshwariofficial
मनोरंजन बातम्या

फॅन्ड्री फेम शालू 'रेडलाईट'मध्ये... पहा ट्रेलर

राजेश्वरी खरात रेडलाईट या लघुपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देहविक्री करणाऱ्या एका वेश्येची कहानी या लघुपटातून राजेश्वरी मांडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीव झाला येडापिसा रात रात जागणं... २०१३ साली आलेल्या फॅन्ड्री (fandry marathi movie) या चित्रपटासह त्याच्या गाण्यानेही महाराष्ट्राला येड लावलं होतं. या चित्रपटातील शालू (shalu) अन् जब्याची अपुर्ण प्रेमकहानी हिट ठरली होती. या चित्रपटात शालूची भुमिका साकारणाऱ्या राजेश्वरी खरातने (rajeshwari kharat) प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली. आता राजेश्वरी एका संवेदनशील विषयावर आधारीत लघुपटात काम करणार आहे. रेडलाईट (redlight) या लघुपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देहविक्री (Prostitution) करणाऱ्या एका वेश्येची कहानी या लघुपटातून राजेश्वरी मांडणार आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर ट्रेलर शेयर केला आहे. (red light is upcoming short film of rajeshwari kharat)

हे देखील पहा -

या लघुपटाचं लेखन, पटकथा आणि दिग्दर्शन अनमोल मुनगंटीवार यांनी केलं आहे. ''सौदा जरी केला तू माझ्या शरीराचा,पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का ? बनते एक स्त्री वेश्या, पण खरच स्वईच्छेने का? प्रश्न हा सोडवून बघ समाजा कळेल मग व्यथा वेश्येच्या मागची स्त्री ची तुला!!!' असे या लघुपटातील वाक्य आहे. रेडलाईट या लघुपटासाठी राजेश्वरीने बरीच मेहनत घेतली आहे. कोणतीही स्त्री देहविक्री स्वतःच्या आवडीने करत नाही तर, काही अडचणींमुळे तिला देहविक्री करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे एका देहविक्री करणाऱ्या महिलेला काय वाटतं, तिला समाजाला काय सांगायचं आहे यावर आधारीत हा लघुपट असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं. या लघुपटाच्या पोस्टरमध्ये राजेश्वरीने लाल रंगाची साडी परिधान केली असून ती एका वेश्यालयात असल्याचं पोस्टरमध्ये दिसतंय. ''रेडलाईट एक विदारक सत्य'' असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. मात्र हा लघुपट कधी रिलीज होणार हे अद्याप कळलेलं नाही.

राजेश्वरी जास्त चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टीव्ह असते. शिवाय ती मॉडेलिंग आणि फोटोशूटही करते. इंस्टाग्रामवर तिचे दोन लाखांपेक्षा जास्त कर फेसबुक पेजवर साडेतीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. २०१३ मध्ये फॅन्ड्री तर २०१७ मध्ये अॅटमगिरी या चित्रपटांत तिने काम केलं आहे. मात्र तिची शालूची भुमिका आजही लोकांच्या मनात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT