Important Comments Of The Court Regarding DNA Testing Saam Digital
मनोरंजन बातम्या

Court on Ravi Kishan: अभिनेता रवी किशनला न्यायालयाचा दिलासा; डीएनए चाचणीसंदर्भात कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Court on Actor Ravi Kishan's DNA Test: अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांना दिंडोशी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. २५ वर्षीय महिलेने रवी किशन यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Sandeep Gawade

अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांना दिंडोशी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. २५ वर्षीय महिलेने रवी किशन यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या अपर्णा सोनी यांनी न्यायालयात धाव घेत असा दावा केला की, रवी किशन यांच्यापासून त्यांना शिनोवा नावाची मुलगी झाली आहे. रवी किशन यांना आपली मुलगी काका म्हणते, मात्र रवी किशन हेच तिचे बायलॉजिकल वडील आहेत.

रवी किशन यांची बाजू मांडणारे वकील अमित मेहता यांनी हा दावा फेटाळून लावत त्यांच्या अशीलाचा अपर्णा सोनी यांच्याशी काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. रवी किशन आणि अपर्णा सोनी चांगले मित्र आहेत, दोघांनी चित्रपटसृष्टीत एकत्र काम केले आहे. पण, दोघे कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते. असे त्यांनी न्यायालयात सांगितले. शिनोवाच्या वतीने ऍड अशोक सरोगी यांनी युक्तिवाद करताना डीएनए चाचणीची मागणी केली.

अपर्णा सोनी यांनी १९९१ मध्ये राजेश सोनीशी लग्न केले. परंतु काही वाद आणि मतभेदांमुळे त्यांनी १९९५ मध्ये घर सोडले. यानंतर त्या रवी किशन यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांचापासून शिनोवा नावाची मुलगी झाली. शिनोवाच्या जन्मानंतर रवी त्यांची काळजी घ्यायचे, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांनी नाते नाकारण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजू कडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता सत्र न्यायालयाने आज (ता.२६) हा निकाल जाहीर केला अपर्णा सोनी आणि रवी किशन यांच्यात संबंध असल्याचा पुरावा नाही असे स्पष्ट करत महिलेची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT