आण्णा नाईक पुन्हा येणार, रात्रीस खेळ चालेची नवी वाटचाल सुरु Saam Tv
मनोरंजन बातम्या

आण्णा नाईक पुन्हा येणार, रात्रीस खेळ चालेची नवी वाटचाल सुरु

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेने आपल्या भागांच्या आजपर्यंतच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशात आणण्याचे काम केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : झी मराठीवरील Zee Marathi रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेने Series आपल्या भागांच्या आजपर्यंतच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशात आणण्याचे काम केले आहे. यासोबतच या मालिकेने अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकर चेही नवी ओळख निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे Lockdown शूटीग बंद असल्याने रात्रीस खेळ चाले सध्या प्रसारीत होत नाही. Ratris Khel Chale serial new episode shooting will resume soon

तरी, लवकरच शूट Shoot सुरू होऊन, पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या साक्षीने पुन्हा या मालिकेची वाटचाल सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आपली लाडकी मालिका पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार असल्याने, चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णा नाईक, माई, शेवंता या आपल्या आवडत्या पात्रांची चाहते वाट बघत आहेत.

हे देखील पहा-

लवकरच शुटींग सुरु होणार मालिकेच्या नवीन भागांच्या प्रसारणाबद्दल बोलत असताना, प्रल्हाद म्हणाला की लवकरच मालिकेचे शूटिंग सुरु होईल. त्यानंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्यामुळे, पावसाचा व्यत्यय होत आहे. पण रात्रीस खेळ चाले ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची इच्छा आहे. Ratris Khel Chale serial new episode shooting will resume soon

तिसऱ्या पर्वातील गोष्ट काही वर्षांनंतरची दाखवलेली आहे. त्यामुळे लोकांना बरेच प्रश्न पडले आहेत, त्यांची उत्तरे पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. या कथेमधील गूढ अधिकाधिक वाढत जाईल. ज्या अण्णा आणि शेवंताला लोकांनी डोक्यावर घेतल आहे. ते आता भूतांमध्ये सामील झालेत. ते नेमके काय करणार आहेत? वाड्याची वाटणी होईल का? वाडा विकला जाईल का? या प्रश्नांची उत्तरे रंजकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

प्रांत ऑफिससमोर आंदोलन; संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमनेसामने, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Marathwada University : ५५ महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित; शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

SCROLL FOR NEXT